Video : धक्कादायक! मराठी मालिकेतील अभिनेत्रीला अज्ञातांकडून मारहाण

ganga aka pranit hate
ganga aka pranit hate

झी मराठी वाहिनीवरील 'कारभारी लयभारी' या मालिकेतील अभिनेत्रीला अज्ञातांकडून भर रस्त्यात मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ट्रान्सजेंडर असलेल्या गंगाला (प्रणित हाटे) या भयानक अनुभवाचा सामना करावा लागला आहे. गंगाने स्वत: तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली. या व्हिडीओत ती खूप घाबरलेल्या अवस्थेत पाहायला मिळत आहे. 

"मी एका बस स्टॉपवर बसची वाट पाहत उभी होती. अचानक काही मुलांनी मला विनाकारण मारण्यास सुरुवात केली. मी काय करू आणि कोणाची मदत घेऊ, ते मला प्लीज सांगा", असं रडत गंगा या व्हिडीओत सांगतेय. घडलेल्या प्रकरणाला घाबरून गंगाने तिथून पळ काढला आणि ऑटोमधून ती घराकडे निघाली. ऑटोमध्ये बसल्यानंतर तिने हा व्हिडीओ शूट केला आहे. आता पुढे काय करावं याची विचारणा ती नेटकऱ्यांकडे करत आहे. गंगाला कोणी आणि का मारहाण केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

प्रणित हाटे म्हणजेच गंगाचा चेहरा 'डान्सिंग क्वीन' या शोमधून महाराष्ट्रासमोर आला. ट्रान्सजेंडर असलेल्या गंगाचा स्वत:चं अस्त्तित्व सिद्ध करण्यापासून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यापर्यंतचा प्रवास अत्यंत बिकट होता. झी युवाच्या मंचावर गंगाला पहिल्यांदा ओळख मिळाली आणि त्यानंतर कारभारी लयभारी मालिकेत ती कलाकार म्हणून वेगळ्या भूमिकेत लोकांसमोर आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com