Saif Ali Khan च्या प्रपोजलला करिनानं चक्क 3 वेळा धुडकावलेलं! पण तोही नवाब.. अशी लढवली शक्कल की...

सैफ अली खाननं करिना कपूरशी 2012 साली अत्यंत साधेपणानं लग्न केलं होतं. आज त्यांना तैमूर आणि जेह ही दोन मुलं आहेत.
saif ali khan and kareena kapoor love story
saif ali khan and kareena kapoor love storyInstagram

saif ali khan and kareena kapoor love story: फेब्रुवारी महिना आला की सुरु होतो व्हॅलेंटाईन फिव्हर...आणि मग बहर चढतो तो लव्ह स्टोरीजना..बॉलीवूडच्या कपल्सच्या प्रेम कहाण्यांचे वारे या निमित्तानं पुन्हा एकदा वाहू लागतात. असंच एक बॉलीवूडचं कपल आहे सैफीना म्हणजे करिना कपूर आणि सैफ अली खान. सैफला करिनाचं प्रेम मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागली होती. चला,जाणून घेऊया या दोघांची लव्ह स्टोरी..

सैफचं करिना सोबत दुसरं लग्न आहे. त्याचं पहिलं लग्न अभिनेत्री अमृता सिंग सोबत झालं होतं. त्याच्या करिअरच्या सुरुवातीला 'बेखुदी' निमित्तानं त्याची आणि अमृताची भेट झाली होती. अमृता त्याच्यापेक्षा वयान १२ वर्षांनी मोठी होती. पण तरिही दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले.

सैफनं १९९१ साली अवघा २१-२२ वर्षांचा असताना अमृतासोबत सीक्रेट मॅरेज केलं. दोघांना दोन मुलं झाली..सारा आणि इब्राहिम.पण जसा काळ पुढे सरकू लागला तेव्हा वयातील अंतर विचारांत जाणवू लागलं आणि त्यामुळेच दोघांमध्ये भांडणं आणि त्यातून नात्यात दुरावा आला. दोघांनी २००४ मध्ये घटस्फोट घेण्याचा अखेर निर्णय घेतला.(Kareen Kapoor rejected saif ali khan proposal 3 times before marriage,4 th time in paris she accepted)

saif ali khan and kareena kapoor love story
Gadar: नाहीतर काजोलच बनली असती 'गदर'ची सकीना.. 'या' कारणामुळे अभिनेत्रीनं दिला होता नकार

अमृतापासून विभक्त झाल्यावर सैफनं ३ वर्ष स्विस मॉडेल रोसा कॅटलानोला डेट केलं. पण ते नातंही फार काळ टिकलं नाही आणि मग सैफनं आपलं लक्ष सिनेमांवर केंद्रित केलं,.कोणत्याही नात्यात पुन्हा न गुंतण्याचा निर्णय घेऊन.

दुसरीकडे त्याचवेळी करिना आणि शाहरुखचं ब्रेकअप झालं होतं. आणि करिना देखील आपल्या करिअरवर फोकस करू लागली होती. करिना आणि सैफनं 'ओंकारा','टशन','एजेंट विनोद' सारख्या सिनेमात एकत्र काम केले होते. यादरम्यान त्यांना एकमेकांची कंपनी आवडू लागली होती.

सैफला करिनामध्ये आपला जोडीदार दिसत होता..त्यानं तिला प्रपोजही केलं होतं. पण करिनानं स्पष्ट नकार दिला होता.

saif ali khan and kareena kapoor love story
Kiara Advani चा लाखोचा लेहेंगा अन् दागिनेही पडले फिके..हातातील कलीऱ्यावर का खिळल्या नजरा? काय आहे खास ?

करिनाला देखील सैफ आवडत होता पण वयातील अंतर आणि सिनेमातलं करिअर यामुळे तिला निर्णय घेणं अवघड जात होतं. करिनानं ३ वेळा सैफच्या प्रपोजलला धुडकावलं होतं. पण चौथ्यांदा सैफनं करिनाला त्या ठिकाणी प्रपोज केलं जिथे त्याची आई शर्मिला टागोर यांना त्याचे क्रिकेटर वडील नवाब पतौडी यांनी प्रपोज केलं होतं.

चर्चच्या समोर सैफनं गुडघ्यावर बसून 'लव्ह सिटी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसमध्ये करिनाला प्रपोज केलं होतं. यावेळी मात्र बेबो सैफला नाही म्हणू शकली नाही. ५ वर्ष रिलेशनशीपमध्ये राहिल्यावर २०१२ मध्ये खूप साध्या पद्धतीनं सैफनं करिनाशी लग्न केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com