सैफ-करिनाच्या घरी आला 'छोटा नवाब'

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

करिना नुकतीच एका पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाली होती. तसेच तिने फॅशन शोमध्येही रॅम्पवॉक केला होता. सैफ व करिना यांचा विवाह 16 ऑक्टोबर 2012 मध्ये झाला होता.

मुंबई - बॉलिवूडमध्ये बेबो म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री करिना कपूरने आज (मंगळवार) सकाळी मुलाला जन्म दिला. तैमुर अली खान असे या मुलाचे नामकरण करण्यात आले आहे.

मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये करीनाने आज सकाळी साडेसात वाजता बाळाला जन्म दिला असून, दोघांची प्रकृती उत्तम आहे. करिनाला मुलगा झाल्याचे वृत्त ऐकून दिग्दर्शक करण जोहरने आनंद व्यक्त केला आहे. तसेच बॉलिवूडमधून सैफ अली खान व करिना कपूर यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

करिना नुकतीच एका पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाली होती. तसेच तिने फॅशन शोमध्येही रॅम्पवॉक केला होता. सैफ व करिना यांचा विवाह 16 ऑक्टोबर 2012 मध्ये झाला होता.

Web Title: Kareena Kapoor and Saif Ali Khan Blessed With A Baby Boy