
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर बाळाचा पहिला फोटो आला समोर
अभिनेत्री करीना कपूर खानने रविवारी २१ जानेवारी रोजी मुलाला जन्म दिला. करीना व बाळाची प्रकृती ठीक असून दोघांनाही आज (मंगळवारी) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात करीनाला दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच बाहेर फोटोग्राफर्सनी गर्दी केली आणि त्यांनी काढलेला बाळाचा पहिला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. गाडीमध्ये करीना मागच्या बाजूला तर पुढे सैफसोबत तैमुर बसला होता. यावेळी आयाच्या हातात लहान बाळ दिसलं.
ऑगस्ट महिन्यात करीना गरोदर असल्याची आनंदाची बातमी सैफने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना सांगितली होती. रविवारी रणबीर कपूरची बहीण रिधिमा कपूर साहनी हिने इन्स्टा स्टोरीमध्ये करीनाला मुलगा झाल्याची पोस्ट लिहिली. त्यानंतर ती सर्वत्र व्हायरल झाली. बाळाच्या जन्माआधीच करीना व सैफ तैमुरसह नवीन घरात राहायला गेले. मुंबईतील वांद्रे इथल्या जुन्या घरासमोरच त्यांनी नवीन घर विकत घेतलं. यामध्ये सैफसाठी मोठी लायब्ररी व तैमुरसाठी नर्सरीसुद्धा आहे.
हेही वाचा : दोन मुलं झाल्यानंतरही इतकी फिट कशी? शाहिदच्या पत्नीने सांगितलं सिक्रेट
हेही वाचा : दहा वर्षात एक 'सैराट' बनून काय उपयोग? गश्मीर महाजनीची रोखठोक भूमिका
गरोदरपणातही करीनाने तिच्या चित्रपटांची व जाहिरातींची शूटिंग सुरू ठेवली. यासोबतच ती सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ पोस्ट करत गरोदरपणातील योगासनांचं महत्त्व चाहत्यांना पटवून देत होती. करीनाच्या 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये आमिर खानची मुख्य भूमिका आहे.