esakal | लहान बाळासोबत करीना व तैमुर; काय आहे 'त्या' व्हायरल फोटोमागचं सत्य?
sakal

बोलून बातमी शोधा

kareena and taimur

करीनाला मुलगी झाल्याच्या चर्चांना उधाण आलंय. 

लहान बाळासोबत करीना व तैमुर; काय आहे 'त्या' व्हायरल फोटोमागचं सत्य?

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अभिनेत्री करीना कपूरच्या दुसऱ्या बाळंतपणाची सध्या जोरदार चर्चा आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो व व्हिडीओ पाहून अनेकांनी वेगवेगळे अंदाज वर्तवले आहेत. करीनाची ड्यु डेट १५ फेब्रुवारी सांगण्यात येत होती. शुक्रवारी तिच्या घरी एकामागोमाग एक भेटवस्तू येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे करीनाने बाळाला जन्म दिला की काय, असा अंदाज नेटकरी वर्तवत आहे. इतकंच नव्हे तर सैफ अली खानसुद्धा खेळणी घेऊन जात असल्याचा फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर आता सोशल मीडियावर करीना व तैमुरचा फोटो चर्चेत आला आहे. या फोटोंमध्ये दोघंही लहान बाळासोबत दिसत आहे. हा फोटो पाहून करीना व सैफच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं की काय, असे प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत. पण या फोटोमागचं सत्य जाणून घेऊयात..

हा व्हायरल झालेला फोटो गेल्या वर्षीचा असून ते लहान बाळ नैना शौनीचं आहे. नैना ही करीनाची खास मैत्रीण आहे. नैनाने बाळाला जन्म दिल्यानंतर करीनाने तिच्या घरी भेट दिली होती. त्यावेळी तैमुरसुद्धा तिच्यासोबत होता. त्यावेळी या दोघांनी त्या बाळासोबत काढलेला फोटो आता व्हायरल होत आहे. 

हेही वाचा : कोणत्याची क्षणी करीना देऊ शकते 'गुड न्यूज'; भेटवस्तूंचा होतोय वर्षाव

हेही वाचा : बार्शीतला प्राध्यापक देशभर गाजला; 'बुचाड'मधून मांडली शेतकऱ्यांची वेदना
 

गरोदर असल्याची गोड बातमी करीना व सैफने ऑगस्ट महिन्यात चाहत्यांना सांगितली होती. 'आमच्या कुटुंबात आणखी एका पाहुण्याचा समावेश होणार असून आम्ही सर्वजण खूप आनंदी आहोत', असं या दोघांनी सोशल मीडियावर लिहिलं होतं. त्यानंतर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत करीनाच्या वडिलांनी तिची ड्यु डेट सांगितली होती. करीनाची आई बबिता व बहीण करिश्मा यांनी शुक्रवारी तिच्या घरी जाऊन तिची भेट घेतली. त्यानंतर करीनाचाही एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे आता 'गुड न्यूज' कोणत्याही क्षणी मिळू शकते, म्हणून तिच्या घरी भेटवस्तूंचा वर्षाव होऊ लागला आहे. 

loading image