Viral Post: 'आणि जेह गडाबडा लोळला...', करिनाच्या दिवाळी स्पेशल फोटोवर नेटकऱ्यांनी घेतली मजा

सध्या सोशल मीडियावर करिना कपूरच्या धाकट्या मुलाची म्हणजेच जेह अली खानचीच चर्चा रंगली आहे.
Kareena Kapoor Khan diwali family photo son jeh throwing tantrums wins over the internet users crazy reaction
Kareena Kapoor Khan diwali family photo son jeh throwing tantrums wins over the internet users crazy reactionInstagram

Viral Post: दिवाळीच्या सणाला यंदा प्रत्येक बॉलीवूडकर पार्टीच्या रंगात रंगलेला दिसला. सोशल मीडियावर सर्वच सेलिब्रिटींनी आपले फोटो शेअर केलेले दिसून आले. करिना कपूर खानने देखील आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली. सर्वच भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना करिनानं इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले होते. या सर्वच फोटोंवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला. पण करिनानं शेअर केलेल्या सर्व फोटोंपैकी एका फोटोला चाहत्यांनी भरभरुन लाईक्स दिलेले दिसले. तो फोटो होता तिच्या धाकट्या मुलाचा,जेहचा. सोशल मीडियावर जेहचा हा फोटो भलताच व्हायरल होताना दिसत आहे. या छोट्या नवाबाचे नखरे पाहून प्रत्येकजण हैराण आहे.(Kareena Kapoor Khan diwali family photo son jeh throwing tantrums wins over the internet users crazy reaction)

Kareena Kapoor Khan diwali family photo son jeh throwing tantrums wins over the internet users crazy reaction
Ramsetu Review: 'जय श्री राम'च्या घोषणांनी दुमदुमलं थिएटर, पब्लिकला कसा वाटला अक्षयचा 'रामसेतू'?

करिना कपूर खानने दिवाळीत लाल रंगाचा सुंदर ड्रेस घातला होता तर तिच्या दोन्ही मुलांनी तैमूर आणि जेहने काळ्या रंगाचे कुर्ता-पायजमा घातले होते. करिनानं आपल्या या फॅमिली फोटोला इन्स्टाग्रामवर शेअर केलं होतं. पण सर्वांच्या नजरा मात्र टिकून राहिल्या त्या जेहच्या फोटोवर. जेहचा हा फोटो त्याच्या सेलिब्रिटी आई-वडीलांच्या फोटोपेक्षा भाव खाऊन गेला.

Kareena Kapoor Khan diwali family photo son jeh throwing tantrums wins over the internet users crazy reaction
Box Office: 'रामसेतू की थॅंक गॉड', पहिल्या दिवशी कोण कोणावर पडलं भारी?, समोर आले आकडे...

फोटोत सैफ आणि करिना आपला मुलगा तैमूरसोबत पोझ देताना दिसत आहे,तर जेह त्यांच्यासमोर जमीनीवर लोळताना दिसत आहे. खरंतर,सैफ आणि करिना आपल्या मुलांसोबत फोटो क्लीक करत फॅमिली फोटो काढण्याच्या प्रयत्नात होते,पण चिमुरड्या जेहचा मूड नव्हता अन् त्याचं काहीतरी बिनसल्यानं तो रडत-रडत जमिनीवर लोळत होता. तर त्याचा मोठा भाऊ,तैमूर जेहकडे बघत फोटोत हसताना दिसत आहे.

'यांची मुलं पण जमिनीवर रडत-रडत लोळतात का?', अशी धमाल प्रतिक्रिया एका नेटकऱ्यानं या फोटोवर दिली आहे. जेहच्या या फोटोवर नेटकऱ्यांसोबत सेलिब्रिटी देखील प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे, 'हे खूप नॉर्मल आहे,जे जेह करत आहे, आमच्या आजुबाजूची लहान पोरं तर रडून-रडून आई-वडीलांना सळो की पळो करून सोडताना दिसतात'. तर एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,'बापरे,यांची पण मुलं अशी हरकत करतात का?' अनेक नेटकऱ्यांनी जेहच्या या हरकतीला आपल्या मुलांशी रिलेट केलं.

Kareena Kapoor Khan diwali family photo son jeh throwing tantrums wins over the internet users crazy reaction
Kareena Kapoor Khan diwali family photo son jeh throwing tantrums wins over the internet users crazy reactionGoogle

करिनानं २१ फेब्रुवारी २०२१ रोजी जेह अली खानला जन्म दिला होता. तर याच वर्षी करिना आणि सैफनं मोठ्या धूमधडाक्यात जेहचा पहिला वाढदिवस सेलिब्रेट केला. करिना-सैफच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचं झालं तर, आमिर खानसोबत ती 'लाल सिंग चड्ढा' सिनेमात दिसली होती. तर सैफ अली खान आता 'आदिपुरुष' सिनेमात लवकरच दिसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com