esakal | करीनाच्या फॅनक्लबने शेअर केले तैमुरच्या भावाचे फोटो
sakal

बोलून बातमी शोधा

kareena kapoor

करीनाच्या फॅनक्लबने शेअर केले तैमुरच्या भावाचे फोटो

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर (kareena kapoor) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते. करीनाने २१ फेब्रुवारी रोजी चिमुकल्या पाहुण्याला जन्म दिला. करीना सोशल मीडियावर तिच्या मुलाचे फोटो पोस्ट करताना विशेष काळजी घेतली आहे. कोणत्याही फोटोमध्ये तिने चेहरा दाखवलेला नाही. पण आता करीनाच्या एका फॅनक्लबने करीनाच्या छोट्या मुलागचे म्हणजेच 'जे' (jeh) चे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसेच सेलिब्रिटी फोटोग्राफर मानव मंगलानीने देखील करीना आणि तिच्या मुलाचा फोटो शेअर केला. (kareena kapoor khans second baby jeh photo viral on social media)

मानवने या फोटोला कॅप्शन दिले, 'आई करीना कपूर खानसोबत क्यूट लिटल जे'. करीनाच्या ‘प्रेग्नन्सी बायबल’ या पुस्कामध्ये 'जे'चा फोटो आहे अशी सोशल मीडियावर चर्चा आहे. करीनाच्या एका फॅनक्लबने देखील करीना आणि 'जे' चे अनसिन फोटो शेअर केले आहेत. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिले, 'आम्हाला करीनाच्या पुस्तकामधून काही अनसिन फोटो मिळाले आहेत. एका फोटोमध्ये तैमुर आणि दुसऱ्या फोटोमध्ये जे आहे.'

काही दिवसांपुर्वी रणधीर कपूर यांनी 'ई टाइम्स'शी बोलताना सांगितले होते, 'करीना-सैफने त्यांच्या दुसऱ्या मुलाचं नाव जे (Jeh)ठेवलंय''

हेही वाचा: पवित्र रिश्ता २: सुशांतची जागा घेताना शाहिरच्या मनात होती 'ही' भावना

सैफ व करीनाने २०१२ मध्ये लग्न केलं. 'टशन' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. २० डिसेंबर २०१६ रोजी तैमुरचा जन्म झाला. दुसऱ्या बाळाच्या जन्माआधी सैफ व करीना नवीन घरात राहायला गेले. गरोदरपणादरम्यान करीना चित्रपटाचे शूटिंग, जाहिरातींसाठी काम करत होती. 'मदर्स डे'च्या निमित्ताने तिने तैमुर आणि त्याच्या छोट्या भावाचा फोटो पोस्ट केला होता. तैमुर सध्या चार वर्षांचा आहे. ऑगस्ट २०२० मध्ये करीना गरोदर असल्याची आनंदाची बातमी सैफ अली खानने सोशल मीडियावर दिली होती.

हेही वाचा: ७० वर्षांचा इंटर्न

loading image