esakal | पवित्र रिश्ता २: सुशांतची जागा घेताना शाहिरच्या मनात होती 'ही' भावना
sakal

बोलून बातमी शोधा

Pavitra Rishta 2

पवित्र रिश्ता २: सुशांतची जागा घेताना शाहिरच्या मनात होती 'ही' भावना

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

2009 मध्ये प्रसारित झालेल्या 'पवित्र रिश्ता' या मालिकेमधील अर्चना आणि मानव ही जोडी प्रचंड लोकप्रिय ठरली. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतने (Sushant Singh Rajput) मानवची तर अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) आर्चनाची भूमिका साकारली होती. या मालिकेचे 1424 एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. आता या मालिकेचा दुसरा भाग म्हणजेच 'पवित्र रिश्ता २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत मानव ही भूमिका अभिनेता शाहिर शेख (Shaheer Sheikh) साकारणार आहे. 'मानव या भूमिकेत लोक मला स्विकारतील का?' असा प्रश्न शाहिरला पडला होता,असं त्याने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले. (Shaheer Sheikh share experience playing Sushant Singh Rajput character in Pavitra Rishta 2)

मानव या भूमिकेबद्दल शाहिरने एका मुलाखतीमध्ये सांगितले, 'अनेक लोक मला विचारतं होते की, 'तु खरच ही भूमिका साकारण्यासाठी तयार आहेस का?' कारण मानव ही भूमिका आधी सुशांतने साकारली होती. त्याला लोकांची विशेष पसंती मिळाली होती. लोकांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा असतील. या सर्व गोष्टींचा विचार करून मला चिंता वाटतं होती. मला असा प्रश्न पडला होता की, लोक मला या भूमिकेत स्विकारतील का? '

हेही वाचा: 'मेहंदी लगा के रखना'; पहा राहुल-दिशाचा मेहंदी सोहळा

शाहिरने सांगिचल्या सुशांत सिंग राजपुरतसोबतच्या अठवणी

मुलाखतीमध्ये सुशांत सिंग राजपुरतसोबतच्या आठवणी सांगताना शाहिर म्हणाला, 'मी सुशांतला दोन वेळा भेटलो होतो. पण मी त्याला वैयक्तिकरित्या ओळखत नव्हतो. मला त्याच्याबद्दल एवढंच माहित होते की त्याने मालिकासोडून चित्रपटांमध्ये काम करण्याचा धाडसी निर्णय घेताला होता. माझ्यासारख्या मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकरांना त्याने अनेक गोष्टी शिकवल्या. मला अठवते की 'काय पो छे' हा सुशांतचा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एका व्यक्तिने मला विचारले होते की, 'तुला या चित्रपटाबद्दल काय वाटते ?'. तेव्हा मी त्याला सांगितले होते की सुशांतने आमच्यासारख्या मालिकेतील कलाकारांना चित्रपटांमध्ये काम करण्याची प्रेरणा दिली. बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खानने देखील सर्कस या मालिकेमधून आपल्या करियरची सुरूवात केली होती.' लवकरच 'पवित्र रिश्ता २' ही मालिका ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे

हेही वाचा: "चांगल्या भूमिका फक्त बिग बींनाच मिळतात"; शरत सक्सेना यांची खंत

loading image