Viral Video : करीना कपूर सार्वजनिक मालमत्ता नाही; नेटकरी का संतापले? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kareena Kapoor Latest News

Viral Video : करीना कपूर सार्वजनिक मालमत्ता नाही; नेटकरी का संतापले?

Kareena Kapoor Latest News आपल्या आवडत्या स्टार्सची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. जेव्हा त्यांना आवडत्या स्टारला भेटण्याची संधी मिळते तेव्हा काहीवेळा ते उत्साहात संयम गमावतात. अशीच घटना बॉलिवूड अभिनेत्री एकता कपूरसोबत घडली. याचा व्हिडिओ पाहून लोकही हैराण झाले आहेत.

सध्या करीनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती फोटो काढण्यासाठी अभिनेत्रीच्या अगदी जवळ आला होता. आपल्या इतक्या जवळ आलेल्या व्यक्तीला पाहून करीना कपूरही घाबरली. व्हिडिओमध्ये करीना विमानतळावर आहे आणि चाहत्यांनी तिला घेरल्याचे दिसते.

एक व्यक्ती करीना कपूरच्या खांद्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न करतो. तो करीनाच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढण्याचा प्रयत्न करतो. परंतु, करीनाच्या रक्षकांनी त्या माणसाचा हात धरून झटकले. यानंतरही तो व्यक्ती पुन्हा पुन्हा अभिनेत्रीसोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा फॅन करीनाच्या जवळ येऊन खांद्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा करीनाही घाबरते.

हेही वाचा: Adipurush Teaser : VFX पाहून आदिपुरुषच्या टीझरवर चाहते नाखूश; म्हटले कार्टून

व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर युजर्सच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. एका युजरने व्हिडिओवर कमेंट करताना लिहिले की, बेबो घाबरली होती. तर दुसऱ्याने लिहिले, यार ती सार्वजनिक मालमत्ता नाही. एकाने लिहिले, एक मर्यादा असते. काही लोकांचे म्हणणे आहे की, करीनाच्या जागी पुरुष अभिनेता असता तर त्याची इतकी हिंमत झाली नसती.