बाळाच्या जन्माआधी करीनाची चाहत्यांसाठी महत्त्वपूर्ण पोस्ट

स्वाती वेमूल
Saturday, 20 February 2021

वाचा, तिने नेमकं काय म्हटलंय?

अभिनेत्री करीना कपूर खान दुसऱ्यांदा आई होणार असून डिलिव्हरीच्या आधी तिने सोशल मीडियावर चाहत्यांसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्री म्हणून तिच्या चाहत्यांसाठी काय वाटतं, हे तिने या पोस्टच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या पोस्टमध्ये तिने चाहत्यांना हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की जगात असे अनेक व्यक्ती असतात, जे एकमेकांना ओळखू शकत नसले तरी त्यांना समजू शकतात.

काय आहे करीनाची पोस्ट?
'घरात, कामाच्या ठिकाणी किंवा आयुष्यात कोणतंही नातं जोडण्यासाठी एकमेकांना समजून घेणं सर्वांत महत्त्वाचं असतं. पण हे दोन्ही बाजूंनी झालं पाहिजे. प्रत्येकाने आपल्याला समजून घ्यावं असं वाटतं. कधी कधी आपल्या जवळचे व्यक्तीसुद्धा आपल्याला समजून घेऊ शकत नाही, पण अनोळखी व्यक्ती सहज समजून घेतो. त्यामुळे ज्या लोकांना आपण जवळून ओळखत नाही, ते लोक आपल्याला लगेच आवडू लागतात. अभिनेता आणि अभिनेत्यांविषयी हेच होते, कारण आपण त्यांना समजू शकतो. आपल्याला करीना कपूर ही नेमकी कशी आहे हे कदाचित माहित नसेल, पण आपण तिला समजू शकतो. तुमच्या आयुष्यात तुम्हाला ओळखणारी लोकं कमी असली तरी चालतील, पण तुम्हाला समजणारी लोकं बरीच असू देत', अशा आशयाची ही पोस्ट आहे. करीनाने ही पोस्ट शेअर करत, 'मी तुला समजू शकते' असं लिहिलं. 
 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Freddy Birdy (@freddy_birdy)

हेही वाचा : लहान बाळासोबत करीना व तैमुर; काय आहे 'त्या' व्हायरल फोटोमागचं सत्य?

हेही वाचा : 'जात महत्त्वाची नसून..'; रिंकू राजगुरूची पोस्ट चर्चेत 

करीनाच्या घरी चिमुकल्या पाहुण्याच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. बुधवारी करीनाची आई व बहिणीने तिची भेट घेतली. अनेकांकडून तिच्या घरी भेटवस्तू पाठवले जात आहेत. सैफ अली खानचाही एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो खेळणी व भेटवस्तू घेऊन जाताना दिसत आहे. ऑगस्ट महिन्यात गरोदर असल्याची गोड बातमी करीनाने चाहत्यांना सांगितली. 'आमच्या कुटुंबात एका नव्या पाहुण्याचा समावेश होणार आहे', अशी पोस्ट तिने लिहिली होती.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kareena Kapoor shares beautiful message ahead of baby birth