esakal | 'जात महत्त्वाची नसून..'; रिंकू राजगुरूची पोस्ट चर्चेत 
sakal

बोलून बातमी शोधा

rinku rajguru

रिंकूच्या या पोस्टला अभिनेता व दिग्दर्शक प्रसाद ओकसह अनेकांनी लाइक केलंय. 

'जात महत्त्वाची नसून..'; रिंकू राजगुरूची पोस्ट चर्चेत 

sakal_logo
By
स्वाती वेमूल

राज्यात शिवजयंतीच्या उत्सवावर कोरोनाचं सावट दिसून आलं. मात्र सोशल मीडियावर पोस्ट लिहित, फोटो व व्हिडीओ शेअर करत सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलं. त्यातच आता 'सैराट' फेम आर्चीची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राज राजगुरूची एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. रिंकूने इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वत:चा पारंपरिक पोशाखातला फोटो पोस्ट केला. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी लिहिलं. 

'छत्रपती शिवराय हे नावंच सर्वसमावेशक आहे. जात महत्त्वाची नसून अन्यायाविरुद्ध लढणे महत्त्वाचे आहे. स्वार्थासाठी नाही तर स्वराज्यासाठी लढणे महत्त्वाचे आहे. राजा माझा सुखकर्ता', असं तिने तिच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय. रिंकूच्या या पोस्टला अभिनेता व दिग्दर्शक प्रसाद ओकसह अनेकांनी लाइक केलंय. 

हेही वाचा : बार्शीतला प्राध्यापक देशभर गाजला; 'बुचाड'मधून मांडली शेतकऱ्यांची वेदना

हेही वाचा : पाठकबाईंचा शिवजयंती विशेष व्हिडीओ एकदा पाहाच!

'सैराट' या पहिल्याच चित्रपटातून रिंकूने मराठी चित्रपटसृष्टीत दमदार पदार्पण केलं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड मोडले होते. आजही या चित्रपटाचं वेड तरुणाईमध्ये दिसून येतं. यामध्ये आर्चीची भूमिका साकारणारी रिंकू सध्या कलाविश्वात सक्रिय असून वेब विश्वातही तिने तिचं नशीब आजमावलं. रिंकू आता लवकरच 'झुंड' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बहुप्रतिक्षित व बहुचर्चित असा हा चित्रपट येत्या १८ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटानिमित्त रिंकू आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे पुन्हा एकदा एकत्र आले. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन मुख्य भूमिका साकारत आहेत. 
 

loading image