Video : तैमूरला झाली कशाची घाई? गाडीतून उतरला अन् थेट काचेवर आदळला

taimur ali khan runs into glass door
taimur ali khan runs into glass door

बॉलिवूडमधील लोकप्रिय स्टारकिड म्हणून कायम तैमूरकडे पाहिलं जातं. अभिनेत्री करीना कपूर खान आणि  सैफ अली खान यांच्या लेकाची कायमच सोशल मीडियावर चर्चा रंगत असते. काही दिवसांपूर्वीच करीनाने दुसऱ्या बाळाला जन्म दिला.मात्र, त्यावेळीदेखील सोशल मीडियावर तैमूरचीच चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे तैमूर पुन्हा एकदा चर्चेत आला असून त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तैमूर करिश्मा कपूरची लेक समायराच्या बर्थ डे पार्टीला जाण्यासाठी आतूर असल्याचं दिसून आलं. इतकंच नाही तर अतिघाई करण्याच्या नादात तैमूर एका काचेच्या दरवाज्यावर आपटल्याचं यात पाहायला मिळालं.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री करिश्मा कपूरच्या लेकीचा समायराचा १६ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी करिश्माने पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीमध्ये करीना कपूरदेखील तैमूरला घेऊन आली होती. मात्र, पार्टीला जाण्याची गडबड करणारा तैमूर थेट काचेच्या दरवाजावर आदळला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ विरल भैय्यानी यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तैमूर करीनासोबत गाडीतून खाली उतरला आणि घाईघाईत करिश्माच्या घरी जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, गडबडीच्या नादात त्याला समोर असलेला काचेचा दरवाजा दिसलाच नाही आणि तो थेट दारावर आदळला. या प्रसंगानंतर करीनासोबतच तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी तैमूरकडे धाव घेतली. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच करीनाने तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. मात्र, सोशल मीडियावर या बाळासोबतच तैमुरचीदेखील चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com