लॉकडाऊन दरम्यानही करिश्मा, करिना, मलाईका असा घालवतायेत एकत्र वेळ

kareena
kareena

मुंबई-  कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सध्या संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे..मालिका , सिनेमांचे शूटींगसुद्धा थांबवण्यात आले आहेत..त्यामुळे सामान्य माणसांसोबतंच सेलिब्रिटी देखील घरात बसून कंटाळले आहेत..याचदरम्यान सेलिब्रिटी घरात काहीना काही करतानाचे अपडेट सोशल मिडीयावर देत असतात..

सोशल मिडीयावर करिना कपूर खान, मलाईका अरोरा, करिश्मा कपूर, अमृता अरोरा यांच्यामध्ये असलेल्या मैत्रीची झलक अनेक वेळा पाहायला मिळते..त्यात आता करिनाने इंस्टाग्रामवर एंट्री घेतल्यामुळे  ती तिचे अनेक अपडेट्स चाहत्यांसाठी देत असते..नुकतंच करिनाने इंस्टाग्रामवर एक फोटो कोलाज शेअर केलं आहे ज्यामध्ये तिची गर्ल गँग दिसत आहे..करिश्मा, मलाईका, अमृता, मल्लिका भट्ट ही करिनाची गर्ल गँग सेल्फ क्वारंटाईनमध्ये डोळे बंद करुन आराम करत आहेत...करिनानाने तिच्या या पोस्टला 'एकत्र आराम करत असलेल्या या मैत्रीणींची ही साथ अशीच कायम राहू दे' असं म्हटलंय...

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Friends that nap together, stay forever

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan) on

करिना सोशल मिडीयावर आल्यापासून तिचे चाहते तिच्यासोबतंच तैमुरच्या अपडेट पाहण्यासाठी देखील उत्सुक असतात...आणि म्हणूनंच तिच्या पोस्टवर अनेकांचं लक्ष असतं..

करिना नुकतीच अंग्रेजी मिडीयम या सिनेमात दिसून आली होती..या सिनेमात तिच्यासोबत इरफान खान आणि राधिका मदन देखील होते..कोरोनाचं संकट येऊ घातलं असताना हा सिनेमा रिलीज झाला होता..आणि रिलीज नंतर काही दिवसांतच चित्रपटगृह बंद ठेवण्याचे आदेश आले होते..त्यामुळे अंग्रजी मिडीयम हा सिनेमा पुन्हा रिलीज होणार असल्याचं कळतंय..

देशभरात कोरोना व्हायरस बाधितांची संख्या ६०६ पर्यंत येऊन पोहोचली आहे..यामध्ये ५६३ भारतीय नागरिक आहेत तर ४३ परदेशी नागरिक आहेत..६०६ मधील ४३ जण बरे झाले आहेत...कोरोना बाधित रुग्णांमध्ये सर्वात जास्त म्हणजेच १२८ रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत...तर केरळमध्ये १०९, कर्नाटकमध्ये ४१, गुजरातमध्ये ३८, उत्तर प्रदेशमध्ये ३७, राजस्थामध्ये ३६, तेलंगणामध्ये ३५ , दिल्लीमध्ये ३१, पंजाबमध्ये २९, हरियाणामध्ये २८, तमिळनाडूमध्ये १८, मध्यप्रदेशमध्ये १४ तर लडाखमध्ये १३ रुग्ण आढळून आले आहेत..जगभरातील देशांबाबत सांगायचं झालं तर न्यूज एजंसी एएफपीच्या आकडेवारीनुसार डिसेंबरमध्ये चीनमध्ये या व्हायरसी पहिली केस आढळून आली होती..त्यानंतर १८१ देशांमध्ये ४ लाख २७ हजार ९४० कोरोनाबाधित रुग्ण आढळले आणि यातील १९ हजार २४६ लोकांचा मृत्यु झाला..  

kareena karisma and malaika are spending some such time during lockdown  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com