
सुशांत सिंग राजपूतवर बायोपीक? बहिण प्रियंकानं नोंदवला आक्षेप
2020 हे साल जितकं कोरोनामुळे गाजलं तितकंच ते गाजलं ते बॉलीवूड स्टार सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput)आत्महत्येमुळे. सुशांतने १४ जून २०२० साली त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. अत्यंत कमी काळात सुशांतनं बॉलीवूडमध्ये आपलं करिअर बनवलं होतं. पण असं नेमकं काय घडलं त्याच्याबाबतीत की त्याला अचानक मृत्यूला जवळ करावसं वाटलं यावरुन अनेक प्रश्न त्याच्या मृत्युपश्चात निर्माण केले गेले. सुशांतला ड्रग्जचं व्यसन लागलं होतं,तो त्याच्या आहारी गेला होता आणि हेच कारण त्याच्या मत्यूला कारणीभूत ठरलं या वादातीत मुद्द्यासोबतच सुशांत बॉलीवूडच्या नेपोटिझमचा बळी ठरला यावरनंही महाभारत घडलं. सुशांतच्या कुटुंबाकडून त्याची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवरही अनेक आरोप लावले गेले.तिला सीबीआयनं चौकशीसाठी आपल्या ताब्यातही घेतलं होतं. हो,पोलिसांकडून केस सीबीआय कडे सोपवणं हे देखील एक महानाट्यच होतं. सुशांतची केस बाजूला राहून काही वेळा तर राजकारणच खेळलं गेलं त्या बिचाऱ्याच्या नावावर.
हेही वाचा: सुश्मिताच्या कडेवर 'तो' चिमुकला कोण? मुलगा दत्तक घेतल्याची चर्चा
अद्यापही सुशांतला न्याय मिळालेला नाही,ती केस कोर्टात सुरूच आहे. त्यातच आता सुशांतची बहिण प्रियंकानं एका गोष्टीवर आक्षेप नोंदवलाय. तर बातमी अशी आहे की,प्रियंकानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केलीय. ज्यात तिनं म्हटलंय,''सुशांतवर बायोपीक काढण्याचा कोणी विचार करीत असेल तर तो विचार त्यानं सध्या तरी सोडून द्यावा. एकतर माझ्या भावासारख्या हॅन्डसम,निष्पाप चेहऱ्याला न्याय देऊ शकेल असा कोणता अभिनेता आहे सध्या? जोपर्यंत सुशांतला न्याय मिळत नाही तोपर्यंत तरी त्याच्यावर सिनेमा काढायचा विचार करू नये. आणि बॉलीवूडमध्ये कोणामध्ये अशी हिमंत आहे त्याच्याविषयीच्या काही ख-या गोष्टी पडद्यावर दाखवण्याची''.
प्रियंकानं पुढं त्या पोस्टमध्ये लिहिलंय,'' सुशांतने अनेक मोठ्या निर्मात्यांना,प्रॉडक्शन हाऊसेसना नकार देऊन आपल्या मनाचं ऐकलं होतं. हे कोण दाखवू शकेल का पडद्यावर? दुसरं म्हणजे सुशांतची इच्छा होती की कधीकाळी त्याच्यावर बायोपीक काढायचा विचार झाला तर त्याची निर्मिती तो स्वतः करेल''. अशी साधारण ती पोस्ट आहे. आता कुणीही सुशांतवर बायोपीक काढण्याची अनाऊंसमेंट केली नसताना प्रियंकानं अशी पोस्ट का केली अचानक? यावरनं चर्चेला उधाण आलंय. तर तिच्या या पोस्टवर सुशांतच्या चाहत्यांनीही सपोर्ट करताना म्हटलंय,'तुम्ही सुशांतला न्याय मिळावा म्हणून सुप्रिम कोर्टत का नाही दाद मागत?' तर एका चाहत्यानं प्रियंकाच्या पोस्टला सपोर्ट करताना, 'सुशांतला न्याय मिळाल्याशिवाय बायोपीक येऊ नये,अन्यथा क्लायमॅक्स मध्ये काय दाखवणार?' असं म्हणत बायोपीकला निषेध दर्शवलाय.
Web Title: Sushant Singh Rajputs Sister Doesnt Want His Biopic Made Asks Who Can Play Her Handsome Innocent Brother On Screen Entertainment
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..