'हिम्मत दाखवायची असेल तर अफगाणिस्तानात...', हिजाब वादात कंगनाची उडी

Kangana Ranaut Reaction Karnataka Hijab Row
Kangana Ranaut Reaction Karnataka Hijab Rowsakal media
Updated on

कर्नाटकमध्ये हिजाबवरून (Karnataka Hijab Row) वाद चांगलाच चिघळला आहे. मुलींना महाविद्यालयात प्रवेश नाकारला जात आहे. यामध्ये आता अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut) उडी घेतली आहे. तुम्हाला हिम्मत दाखवायची असेल तर हिजाब न घालता अफगाणिस्तानमध्ये वावरून दाखवा, असं आव्हान कंगनानं हिजाब समर्थनार्थ लढणाऱ्या लोकांना दिलं आहे.

Kangana Ranaut Reaction Karnataka Hijab Row
ट्वीटरवर कंगना विरोधात वीर दास रंगला वाद;वाचा सविस्तर

कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर करत हे लिहिलंय. मुक्त होऊन जगायला शिका, स्वतःला पिंजऱ्यात ठेवू नका. हिम्मत दाखवायची असेल तर अफगाणिस्तानमध्ये हिजाब न घालता वावरून दाखवा, असं कंगना म्हणाली.

हिजाबवरून वाद का सुरू झाला?-

कर्नाटकमध्ये उडपीमधील एका महाविद्यालयात सहा विद्यार्थिनींना हिजाब घातला म्हणून प्रवेश नाकारण्यात आला. त्यानंतर त्या विद्यार्थिनींना शिक्षणा विभागात तक्रार केली. पण, मुलींनी महाविद्यालयीन गणवेशातच यावं, असं सांगण्यात आलं. त्यानंतर मुलींनी न्यायालयात धाव घेतली. मुली जर हिजाब घालून महाविद्यालयात आल्या, तर हिंदूत्ववादी विद्यार्थी भगवे शेले घेऊन येतील, अशी भूमिका काही हिंदूत्ववादी संघटनांनी घेतली आहे.

हिजाबचा वाद कधी चिघळला?-

गेल्या दोन महिन्यांपासून उडपीमध्ये हिजाबवरून वाद सुरू होता. पण, हळूहळू उडपीच्या आजूबाजूच्या जिल्ह्यात हे लोण पसरलं. कुंदापूरमध्ये देखील हिजाब घातलेल्या मुलींना महाविद्यालयाने प्रवेश नाकारला. फेब्रुवारी महिन्यात हा वाद अधिक तीव्र झाला. काही दिवसांपूर्वी एक मुलगी हिजाब घालून आली असता भगवे शेले घातलेल्या तरुणांनी ''जय श्री राम'' अशा घोषणा देत तिला घेराव घातला. त्यानंतर हा वाद आणखीच चिघळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com