कर्नाटकात 'शेहनशाह'ची लक्झरी कार जप्त; बंगळूरू RTO ची कारवाई

Amitabh Bachchan
Amitabh Bachchanesakal

कर्नाटक : बंगळूरू आरटीओनं (Bangalore RTO) 22 ऑगस्टच्या सायंकाळी यूबी शहराजवळ एक विशेष कारवाई केली. ज्यात त्यांनी सुमारे 17 कार जप्त केल्या. विशेष म्हणजे, करोडो रुपयांच्या या गाड्यांमध्ये रोल्स-रॉयस फँटम (Rolls-Royce Phantom) गाडीचाही समावेश होता. जी बॉलिवूडचे शेहनशाह बिग बी अमिताभ बच्चन (Indian Actor Amitabh Bachchan) यांची होती. आता ही सर्व वाहने सीटी आरटीओच्या ताब्यात आहेत. जप्त केलेल्या गाड्यांमध्ये रोल्स-रॉयस फँटम, लँड रोव्हर रेंज रोव्हर इव्होक, जग्वार एक्सजे एल, फेरारी, ऑडी, आर8, पोर्शेसह अन्य वाहनांचा समावेश आहे.

Summary

कर्नाटक परिवहन विभागाने बच्चन यांची करोडो रुपयांची रोल्स-रॉयस फँटम गाडीसह अन्य गाड्या जप्त केल्या आहेत.

कर्नाटक परिवहन विभागानं (Karnataka Transport Department) बच्चन यांची करोडो रुपयांची रोल्स-रॉयस फँटम गाडीसह अन्य गाड्या जप्त केल्या आहेत. यामध्ये गाडी चालवणाऱ्या व्यक्तीची ओळख सलमान खान अशी असून ही व्यक्ती वसंतनगरची रहिवासी आहे. सलमानच्या वडिलांनी बच्चन यांच्याकडून ही कार खरेदी केल्याची माहिती समोर आली असून याला अतिरिक्त परिवहन आयुक्त एल. एल. नरेंद्र होळकर (Transport Commissioner L. L. Narendra Holkar) यांनी दुजारा दिलाय.

Amitabh Bachchan
'नेल पॉलिश' लावल्यास महिलांची बोटं छाटणार; तालिबान्यांचा नवा फतवा
Karnataka Transport Department
Karnataka Transport Department

याबाबत अधिक माहिती अशी, निर्माते विधु विनोद चोप्रांनी बिग बींना ही कार भेट म्हणून दिली होती. सन 2007 मध्ये आलेल्या 'एकलव्य' या चित्रपटाच्या यशानंतर त्यांनी बिग बींना ही कार भेट दिली होती. तद्नंतर 2019 मध्ये 'उमरा डेव्हलपर्स'च्या युसूफ शरीफ उर्फ डी. बाबू यांना बच्चन यांनी ही कार विकली होती. परंतु,कारचे कोणतेही व्यवहार झाले नसल्याने या कारची मालकी अद्याप बच्चन यांच्या नावावरच असल्याचे स्पष्ट झालेय. मात्र, अधिकाऱ्यांनी केलेल्या अधिक चौकशीअंती बाबू यांनी ही लक्झरी कार बिग बी यांच्याकडू खरेदी केल्याची कबुली दिलीय. बाबू म्हणाले, मी या गाडीचा कधीतरच वापर करतो. माझ्या वडिलांनी बच्चन यांच्याकडून तब्बल 6 कोटी रुपयांना ही लक्झरी कार खरेदी केली होती. या वाहनाची कागदपत्रे सादर केल्यानंतर मला माझी गाडी पुन्हा परत मिळेल, असंही त्यांनी स्पष्ट केलेय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com