
Aashiqui 3 : एक्स गर्लफ्रेंड सोबत कार्तिक आर्यन पुन्हा करणार रोमान्स, फॅन्स म्हणाले... असं करु नको भावा
Aashiqui 3 Kartik Aryan - Sara Ali Khan: कार्तिक आर्यनचा 'शेहजादा' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा येत्या काही दिवसांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण शाहरुखच्या पठाण मुळे या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. शेहजादा रिलीज होत आहे तोच कार्तिक आर्यनच्या नवीन सिनेमाची घोषणा झाली आहे. हा सिनेमा म्हणजे आशिकी ३. आशिकी सिनेमात कार्तिक सोबत हिरोईन म्हणून कोण झळकणार अशी चर्चा सगळीकडे होती.
(Karthik Aaryan will romance again with ex-girlfriend sara ali khan )
आता कार्तिकच्या हिरोईनचं नाव समोर आलंय. हि हिरोईन दुसरी तिसरी नसून ती आहे कार्तिकची एक्स गर्ल्फ्रेन्ड सारा अली खान. त्यामुळे कार्तिक आता आशिकी ३ मध्ये सारा अली खान सोबत रोमान्स करणार आहे. त्यामुळे ब्रेकअप नंतर कार्तिक आणि सारा पुन्हा एकदा प्रोफेशनली एकत्र येत आहेत. पण हे दोघे एकत्र येताच फॅन्सनी मात्र वेगळीच चर्चा सुरु केलीय
सारा अली खानने अलीकडे काही सिनेमात अभिनय नीट केला नव्हता. त्यामुळे जेव्हा नेटकऱ्यांना कळलं कि कार्तिक आणि सारा एकत्र येत आहेत तेव्हा नेटकऱ्यांनी कार्तिकला सावध राहण्याचा सल्ला दिलाय. एका युजरने कमेंट केली आहे कि, भावा जेनिफर विंगेट ला घे आणि हा सिनेमा वाचव. याशिवाय एका नेटकऱ्याने, असं प्लिज करू नका. कार्तिक आणि आशिकी ३ ला वाचवा असं अजिबात करू नका अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
आता कार्तिक आणि सारा आशिकी ३ मध्ये एकत्र येणार त्यामुळे सिनेमा सुपरहिट होणार कि फ्लॉप होणार हे सिनेमा रिलीज होईल तेव्हाच कळेल. या सिनेमात अभिनेते पंकज त्रिपाठी सुद्धा महत्वपूर्ण भूमिकेत आहेत. याआधी सुद्धा मुकेश भट यांनी सांगितलं होतं कि आम्ही आशिकी ३ साठी नवीन हिरोईन शोधत आहेत. परंतु अचानक सारा अली खानचं नाव समोर येत असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
कार्तिक आर्यनचा शेहझादा आधी १० फेब्रुवारीला रिलीज होणार होता. पण शाहरुख खानचा पठाण सध्या जोरात सुरू असल्याने शेहजादा आता १७ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे