Karthik Aryan: शाहरुखच्या कानात कार्तिक काय सांगत होता? |Karthik Aryan whispered Shahrukh khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Karthik Aryan news

Karthik Aryan: शाहरुखच्या कानात काय कार्तिक काय फुसफूसत होता?

Karthik Aryan: भुलभलैय्या 2 मध्ये जोरदार कामगिरी केलेल्या कार्तिक आर्यनची सध्या मोठी हवा आहे. करण जोहरनं त्याला त्याच्या चित्रपटातून बाहेरचा रस्ता (Entertainment News) दाखवल्यानंतर कार्तिकला मोठा धक्का बसला होता. अनेक निर्मात्यांना काय कराव कळेना, याचे कारण त्यांच्या चित्रपटातून कार्तिक (Karan Johar) आर्यनला वगळावं अशा प्रकारच्या बातम्या व्हाय़रल झाल्या होत्या. अखेर हे प्रकरण शांत झालं. ज्या करणनं कार्तिकवर टीका केली होती आता त्यानंच पुन्हा कार्तिकला आपल्या शोमध्ये बोलावलं होतं. त्यात कार्तिकनं करणचे कान टोचले होते. यासगळ्यात कार्तिक भलत्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. त्याचे कारण त्यानं शाहरुखच्या कानात केलेली फुसफूस...

कार्तिक आर्यन आणि शाहरुखचा एक व्हिडिओ जोरदारपणे सोशल मीडियावर (Social media viral news) व्हायरल झाल्याचे दिसत आहे. त्यात शाहरुख कार्तिकचे कौतूक करताना दिसत आहे. त्याचवेळी कार्तिक आर्यन हा शाहरुखच्या कानात काही सांगत असल्याचे नेटकऱ्यांनी नोटीस केले. त्यावरुन कार्तिकनं शाहरुखचे कान भरले असे बोलले जात आहे. पण यासगळ्यात कार्तिकनं नेमकं असं सांगितलं तरी काय याची चर्चा सुरु झाली आहे. चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे ती म्हणजे कार्तिकन शाहरुखच्या कानात असं काय सांगितलं की, त्यामुळे किंग खाननं लगेच त्याचं कौतूकही केलं? आर्यननं एका मुलाखतीतमध्ये त्याचा खुलासा केला आहे.

हेही वाचा: Liger: विजय देवरकोंडाच्या ७५ फूट उंच कट आऊट्सला दुधाची आंघोळ,Video Viral

कार्तिक म्हणतो, ती गोष्ट माझ्या भुलभुलैय्याविषयीची होती. तो चित्रपट किंग खाननं पाहिला का असा प्रश्न त्याला मी विचारला होता. त्यावेळी तो मला म्हणाला की, हो पाहिला आणि मला तो खूप आवडला. बॉलीवूड हंगामाला दिलेल्या एका मुलाखतीमद्ये कार्तिक आर्यननं त्या गोष्टीविषयी सांगितलं आहे. शाहरुख सर तुम्ही माझा भुलभुलैय्या 2 पाहिला का, त्यावर त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी माझं कौतूकही केलं. बाळा तू खूप चांगलं काम केलं आहे. कार्तिकचा जेव्हा भुलभुलैय्या हिट झाला तेव्हा त्याला किंग असं म्हटलं जाऊ लागले. हा टॅग शाहरुखसाठी वापरला जातो.

हेही वाचा: Ananya Review: अनन्याच्या जिद्दीची 'प्रेरणादायी कथा'!

कार्तिकच्या भुलभुलैय्यानं 230 कोटींपेक्षा जास्त कमाई केल्याचे दिसून आले. त्यात कियारा अडवाणी, मिलिंग गुणाजी, तब्बू, यांच्या भूमिका होत्या. कार्तिक हा सध्या त्याच्या शहजादा नावाच्या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त असल्याचे दिसून आले आहे.

Web Title: Karthik Aryan Whispered Shahrukh Khan Bollywood King Compliment Actor Praised

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top