
करण सोबतच्या वादावर कार्तिकनं सोडलं मौन; म्हणाला,'लोकं जे बोलत आहेत ते...'
कार्तिक आर्यनचे (Kartik Aaryan) चाहते तेव्हा खूप खुश झाले होते जेव्हा करण जोहरनं(Karan Johar) त्यांच्या लाडक्या अभिनेत्याला सिनेमा ऑफर केला होता. त्या सिनेमाचं नाव होतं 'दोस्ताना 2'. कार्तिकनं सिनेमाचं शूटिंगही सुरु केलं होतं. पण त्यानंतर बातमी आली की कार्तिकला सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनकडून कार्तिकला 'दोस्ताना २' मधून काढून टाकल्याच्या बातमीला कन्फर्म देखील करण्यात आलेलं. अर्थात त्यावेळेला यामागचं कारण सांगितलं गेलं नव्हतं. त्यावेळी कार्तिक आर्यन संदर्भात अनेक चुकीच्या गोष्टी समोर आल्या होत्या. कार्तिकचं वागणं प्रोफेशनल नसल्याचं त्यावेळी खूप बोललं गेलं होतं. पण त्यावेळेला कार्तिकनं गप्प राहणं पसंत केलं होतं.
हेही वाचा: The Kashmir Files नवा वाद, विवेक अग्निहोत्रींची थेट केंद्राकडे तक्रार
आता एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत कार्तिकनं म्हटलं आहे,''मी फक्त माझ्या कामावर लक्ष केंद्रित केलं आहे. मी फक्त एवढचं बोलू शकतो. माझ्याकडे खूप सिनेमे लाइनअप आहेत. लोकं जे बोलत आहेत त्यात फारसं तथ्य नाही. कितीतरी वेळा लोकं उगाचच एखाद्या गोष्टीला रंगवून सांगतात. बस्स,मी फक्त एवढंच बोलेन. कोणाजवळ वेळ नाही आहे या अशा गोष्टीत तो खर्ची करायला. सगळ्यांना काम करायचं आहे,चांगलं काम हवंय सगळ्यांना. याव्यतिरिक्त जे बोललं जात आहे ती अफवा आहे''.
हेही वाचा: ओटीटी वर RRR आणि KGF 2 एकामागून एक धडकणार; जाणून घ्या प्रदर्शनाच्या तारखा
सध्या कार्तिक 'भूलभूलैय्या २' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. २० मे,२०२२ रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 'भूलभूलैय्या' सिनेमाचा हा सिक्वेल आहे. पहिल्या भागात अक्षय कुमार,विद्या बालन मुख्य भूमिकेत होते. काही दिवसांपूर्वीच 'भूलभूलैय्या २' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आता चाहत्यांना पहायचं आहे कार्तिकनं सिनेमात काय कमाल केली आहे. 'भूलभूलैय्या २' मध्ये कार्तिक सोबत तब्बू आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
हेही वाचा: कोण होणार कंगनाच्या 'लॉकअप'चा विजेता कैदी? चाहत्यांची उत्सुकता शिगेला...
कार्तिक या व्यतिरिक्त 'शहजादा','कॅप्टन इंडिया' सिनेमात दिसेल. इतकंच नाही तर काही दिवसांपूर्वी बातमी कानावर पडली होती की कार्तिक आणि कियारा पुन्हा एका नव्या सिनेमाच्या माध्यमातून स्क्रीन शेअर करणार आहेत. 'सत्यनारायण की कथा' असं त्या सिनेमाचं नाव आहे.
Web Title: Kartik Aaryan Breaks Silence On His Fallout With Karan Johar And Dharma
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..