The Kashmir Files नवा वाद, विवेक अग्निहोत्रींची थेट केंद्राकडे तक्रार Vivek Agnihotri | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

The Kashmir Files Movie New Controversy

The Kashmir Files नवा वाद, विवेक अग्निहोत्रींची थेट केंद्राकडे तक्रार

'द काश्मिर फाईल्स'(The Kashmir Files) सिनेमा प्रदर्शनापासूनच चर्चेत राहिला आहे. सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री(Vivek Agnihotri) देखील सिनेमाच्या विरोधात बोलणाऱ्यांवर पलटवार करण्याची एकही संधी सोडत नाही. काही दिवसांपूर्वी विवेक अग्निहोत्री यांनी विकिपीडियावर आपल्या सिनेमाला काल्पनिक म्हटल्यामुळे निशाणा साधला होता. आता विवेक यांनी त्यांच्या विरोधात मीडियानं जे 'हेट कॅम्पेन' चालवलं आहे त्यावर वक्तव्य केलं आहे. हा सारा वाद सुरु झाला तो विवेक यांची पत्रकार परिषद रद्द केल्यामुळे. चला हे प्रकरण सविस्तर जाणून घेऊया.

विवेक अग्निहोत्री यांना 'द काश्मिर फाईल्स' आणि काश्मिरी पंडितांचा नरसंहार यावर संवाद साधण्यासाठी एका पत्रकार परिषदेत निमंत्रित केलं गेलं होतं. ५ मे रोजी फॉरेन करस्पॉन्डंट्स क्लब तर्फे या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. पण त्यानंतर अचानक ही पत्रकार परिषद रद्द केली गेली. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आता आरोप केला आहे की मीडियातील काही दिग्गजांनी या पत्रकार परिषदेवर आक्षेप घेतल्यामुळे ती रद्द करण्यात आली आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या विरोधात पुकारलेलं हे एक आंदोलन आहे असं म्हटलं आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये FCCवर निशाणा साधत थेट केंद्रिय मंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यांनी लिहिलं आहे, 'भारत विरोधी विचार करणाऱ्या FCC च्या हातात एवढी मोठी जबाबदारा देण्यामागे काय कारण आहे?'

हेही वाचा: ओटीटी वर RRR आणि KGF 2 एकामागून एक धडकणार; जाणून घ्या प्रदर्शनाच्या तारखा

पत्रकार परिषद रद्द केली गेल्यानंतर विवेक अग्निहोत्री यांनी सांगितलं की,'' ५ मे ला प्रेस क्लब ऑफ इंडिया मध्ये मी पत्रकार परिषद घेणार होतो. पण तिथली पत्रकार परिषदही रद्द केली गेली. प्रेस क्लबनं सांगितलं की पत्रकार परिषद आयोजित करण्यासाठी एक प्रोसेस असते त्याचं पालन करावं लागतं. अॅडव्हान्स बुकिंग करावी लागते''. विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीटरवर म्हटलं की, ''प्रेस क्लबचं बुकींग त्यांच्या एजन्सीच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. पण आता ते याचा विरोध करत आहेत''. विवेक यांनी चॅटचा स्क्रीन शॉट्स आणि बुकिंग स्लिप शेअर केली आहे.

हेही वाचा: शिवाजी महाराजांच्या फौजेतील 'सरनोबत' माहितीयत? पराक्रमी इतिहास आता पडद्यावर

PCI आणि FCC यांनी दिलेली वागणूक पाहिल्यानंतर विवेक अग्निहोत्री यांनी घोषणा केली आहे की ५ मे ला दिल्ली मध्ये जनपथ येथील हॉटेलमध्ये ते दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद घेतील. दिग्दर्शक ओपन हाऊस पद्धतीत ही पत्रकार परिषद घेणार आहेत. जिथे ते कोणत्याही विचारलेल्या प्रश्नाच उत्तर देणार आहेत. विवेक यांनी आपल्या ट्वीटमध्ये PCI आणि FCC वर चांगलाच निशाणा साधला आहे. त्यांचं म्हणणं आहे की,पत्रकार परिषदेला रद्द केलं त्यामागे मला विरोध करण्याचा हेतू होता. मी एक व्हिक्टिम आहे. विवेक यांनी एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. विवेक अग्निहोत्री यांचा द काश्मिर फाईल्स सिनेमा प्रदर्शित होऊन इतके दिवस झाले तरी या सिनेमावरनं होणारे वाद काही थांबत नाही.

Web Title: The Kashmir Files News Controversyfcc And Pci Press Conference

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top