
'आश्रम' च्या सेटवर प्रकाश झा यांच्यावर हल्ला; म्हणाले,'तब्बल एक तास...'
बॉबी देओलची(Bobby Deol) प्रसिद्ध वेबसिरीज 'आश्रम'(Ashram) चा तिसरा सिझन प्रदर्शनासाठी सज्ज आहे. या सिरीजचा निर्माता प्रकाश झा (Prakash Jha) आपल्या वेबसिरीजचा अगदी दणक्यात प्रचार करीत आहेत. या वेबसिरीजच्या प्रमोशन कार्यक्रमात प्रकाश झा यांनी एक मोठा खुलासा करत सगळयांनाच धक्का दिला. त्यांनी गेल्यावर्षी या वेबसिरीजच्या शूटिंग दरम्यान बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तब्बल एक तास सेटवर घातलेला गोंधळ आणि त्यांच्यावर केलेला हल्ला याविषयी सांगितलं आहे. प्रकाश झा म्हणाले कि,''बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सेटवर तोडफोड केली आणि त्यांच्यावर शाई देखील फेकली. बजरंग दलाचा दावा होता की या सीरिजमध्ये हिंदू धर्माविषयी-समाजाविषयी खूप चुकीच्या गोष्टी दाखवल्या गेल्या आहेत.
हेही वाचा: दगडु-प्राजक्ताचा 'टाइमपास 3' लवकरच; हृता दुर्गुळे दिसणार दबंग अंदाजात
प्रकाश झा यांनी या तोडफोडीविषयी सांगताना म्हटलं, ''बजरंग दलातील कार्यकर्त्यांचा तो ग्रुप आला आणि सेटवर तोडफोड करून गेला. पण हे सगळं झाल्यानंतरही आम्ही सिनेमाचं त्या दिवशीचं शूटिंग पूर्ण केलं''. तो पुढे म्हणाले की,''आपल्या समाजात खूप वेगवेगळ्या प्रवृत्तीची माणसं असतात,त्यामुळे ही अशी तोडफोड कधीही होऊ शकते. 'गंगाजल','अपहरण','राजनिती' अशा सामाजिक आणि राजकारणावरील सिनेमांची निर्मिती करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रकाश झा यांनी स्पष्ट केलं आहे की,''या तोडफोडीच्या घटनेनंतरही सिरीजमधील कथा बदलण्याबाबत आपण विचार केलेला नाही. कारण ते आले,तोडफोड केली आणि निघून गेले,त्यांच्यासोबत या मुद्द्यावर बसून चर्चा झाली नाही''.
हेही वाचा: कंगनाच्या 'धाकड' चे शो कॅन्सल, कार्तिकच्या 'भूलभूलैय्या 2' ने केलं गारद
प्रकाश झा म्हणाले की,''माझ्यावर हा हल्ला झाल्यानंतर मला पाठिंबा देण्यासाठी सिनेइंडस्ट्रीतील निर्माता संघ आणि इतर अनेक सिनेमांशी संबंधित संघटना मदतीला धावून आल्या. मी त्या सगळ्यांचा आभारी आहे,पण मी या संदर्भात कोणाकडेही अद्याप सहकार्य मागितलेलं नाही. मला स्वतःवर विश्वास आहे,त्यामुळे मी न घाबरता माझं काम करणं सुरू ठेवलं''.
हेही वाचा: हर्षद मेहतानंतर आता मास्टरमाइंड तेलगी वर वेबसिरीज; 'Scam 2003' चर्चेत
'आश्रम' वेब सिरीजचा तिसरा सिझन ३ जून रोजी एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये बॉबी देओल 'बाबा निराला' च्या भूमिकेत दिसेल. ही वेब सिरीज समाजात कुठे ना कुठे घडणाऱ्या सत्य घटनांवर आधारित आहे. या सिरीजवर समाजातील साधु-संत यांची प्रतिमा खराब करण्याविषयीचे आरोप याआधीही लावण्यात आले आहेत. तसंच, या सिरीजवर बंदी आणण्याची देखील मागणी करण्यात आली होती.
Web Title: Prakash Jha And Ashram 3 Team
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..