कार्तिक आर्यन आहे अंधविश्वासू; हॉटेल रुममध्ये एकटा असताना करतो अजब हरकत Kartik Aaryan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kartik Aaryan

कार्तिक आर्यन आहे अंधविश्वासू; हॉटेल रुममध्ये एकटा असताना करतो अजब हरकत

'भूलभूलैय्या २'(Bhoolbhulaiyaa) या महिन्यात प्रदर्शित होत आहे. सिनेमाच्या प्रमोशनमध्ये सध्या कार्तिक आर्यन(Kartik Aaryan) व्यस्त आहे. कार्तिक आर्यननं या प्रमोशन दरम्यान आपल्या आयुष्याशी संबंधित एक इंट्रेस्टिंग गोष्ट सांगितली आहे. याचवेळी अक्षय कुमारसोबत केली जाणारी तुलना यावर देखील कार्तिकनं आपलं मत मांडलं आहे.

हेही वाचा: हॉलीवूड अभिनेत्यावर पत्नीचा खळबळजनक आरोप; म्हणाली,'तो माझ्या गुप्तांगात...'

'भूलभूलैय्या २' विषयी बोलताना कार्तिक म्हणाला,''मी या सिनेमाविषयी खूप उत्सुक होतो. पहिल्यांदाच मी हॉरर कॉमेडी जॉनर असलेला सिनेमा करीत आहे. या सिनेमाला घेऊन जेव्हा अनीस बझ्मी माझ्याकडे आले तेव्हा त्यांनी सुरुवातीला मला कथा ऐकवली. सिनेमाचं टायटल मला नंतर सांगितलं. एका नव्या दमाच्या कथेला घेऊन हा सीक्वेल बनवला गेला आहे. तुम्ही पण पहाल तर कळेल की सगळं तसंच दिसत असलं तरी कथा मात्र एकदम नवीन आहे. सिनेमाच्या शूटिंग दरम्यान मी रुह बाबाच्या गेटअपमध्ये होतो,तेव्हा खरंच सुपर हिरो सारख्या भावना माझ्या मनात उमटल्या होत्या. मी विज्ञान शाखेत शिकलो आहे. त्यामुळे माझ्यासाठी एखादी गोष्ट थोडक्यात जादू घडत असताना ती का होतेय याचं लॉजिक खूप महत्त्वाचं ठरतं. पण या सिनेमात दिग्दर्शक तुम्हाला अशा जगात घेऊन जाईल,जिथे हे सगळं मागे राहतं. मी छातीठोक पणे हे सांगू शकतो की तुम्ही देखील सिनेमा पाहताना याचा अनुभव घ्याल''.

हेही वाचा: हॉलिवूडचे डार्क सीक्रेट्स: कुणाला आंघोळीचा कंटाळा तर कुणाचे वडील होते चोर

अक्षय कुमार सोबत कार्तिकची तुलना होतेय. त्यावर तो म्हणाला,'' हे तर होणारच होतं. पण मी स्वतः देखील या गोष्टीचा विचार करुन अक्षयसोबत स्वतःची तुलना करू लागलो तर माझं कामावरनं लक्ष विचलित होईल. जेव्हा पासून हा सिनेमा माझ्याकडे आला तेव्हापासून मी या सिनेमाकडे एक नवा सिनेमा,फ्रेश कॉन्सेप्ट म्हणूनच पाहतो आहे''.

रोमॅंटिक हिरोची इमेज असलेल्या कार्तिक आर्यनला टाइपकास्ट होण्याची भीती नाही वाटत. तो म्हणतो,''मला माझी इमेज मोडायची नाही. हे स्क्रीप्टवर अवलंबून आहे. जर मला एकामागोमाग एक अशा तिन्ही सिनेमात रोमॅंटिक हिरोची भूमिका मिळाली तर मी ते तिन्ही सिनेमे करेन. फक्त कथा चांगली हवी''. कार्तिक त्याच्या आयुष्यात अंधविश्वासू आहे असं म्हणाला. यावर स्पष्टीकरण देताना तो म्हणाला,''मला अंधाराची भीती वाटते,आजही मी हॉटेलच्या रुममध्ये लाइट लावून झोपतो. जेव्हा मी एकटा झोपलेला असतो तेव्हा मनात खूप विचित्र गोष्टी येतात. आणि मग मी घाबरून लाईट्स लावून झोपतो. तसा मी अंधविश्वासू नाही पण मी त्या एका शक्तीवर विश्वास ठेवतो. मग ती चांगली किंवा वाईट शक्ती असो''.

Web Title: Kartik Aaryan Is Superstitious Strange Objections When Alone In A Hotel

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top