Aditya Roy Kapur:'अभिनेत्यावर ही वेळ का यावी..',आदित्यचा हॉटेलमधील व्हायरल व्हिडीओ पाहून चाहते हैराण

सोशल मीडियावर आदित्या रॉय कपूरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे,ज्यात तो गेस्ट सर्व्हिसिंगचं काम हॉटेलमध्ये करताना दिसत आहे.
Aditya Roy Kapur
Aditya Roy KapurInstagram

Aditya Roy Kapur: आदित्य रॉय कपूरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. त्या व्हिडीओत तो एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये लोक येऊन येऊन त्याच्यासोबत सेल्फी काढताना दिसत आहेत आणि त्याला पाहून अर्थात लोक खूश होतानाही नजरेस पडत आहे.

पण जसा हा व्हिडीओ व्हायरल झाला तसं लोकांना एक प्रश्न सतावू लागलाय तो म्हणजे आदित्य रॉय कपूरनं आपलं फिल्ड चेंज केलं की काय? अखेर सिनेमा सोडून त्याला हॉटेलमध्ये काम करण्याची गरजच का पडली?

आता हे आपल्यापैकी जवळपास सर्वांनाच माहीत आहे की बरेच सेलिब्रिटी सिनेमात काम करण्या व्यतिरिक्त इतर कुठल्या ना कुठल्या बिझनेसमध्ये पैसा गुंतवतात. पण इथे थोडं चित्र वेगळं पहायला मिळाल्यानं चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. (Aditya Roy kapur viral video from hotel)

Aditya Roy Kapur
Kiran Mane: 'बिग बाॅसच्या घरात आपण बोललो ते करून दाखवलं..', तेजस्विनी लोणारीसाठी किरण मानेंची पोस्ट चर्चेत

त्याचं झालं असं की आदित्य रॉय कपूर सध्या 'द नाइट मॅनेजर' या आपल्या आगामी वेबसिरीजमध्ये व्यस्त आहे. सध्या तो त्याचं प्रमोशन करताना दिसतोय. या सीरिजला प्रमोट करण्यासाठी तो एका हॉटेलमध्ये रियल लाइफ मॅनेजर बनून काम करताना दिसला.

आणि मग काय त्याचा हा व्हिडीओ पाहता पाहता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. आदित्य रॉय कपूरची ही सीरिज OTT प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. यामध्ये अनिल कपूर देखील त्याच्यासोबत दिसणार आहेत.

Aditya Roy Kapur
Subodh Bhave:'लहापणापासूनच ज्याच्या गोष्टी ऐकल्या..', शिवरायांनंतर सुबोध भावे साकारणार 'ही' ऐतिहासिक भूमिका

ज्या व्हायरल व्हिडीओ संदर्भात आपण बोलत आहोत त्यात हॉटेलमध्ये आलेले एक गेस्ट कपल आदित्य रॉय कपूर सोबत सेल्फी घेताना दिसत आहेत. तिथून निघण्याआधी ते आदित्यसोबत शेकहॅंड देखील करतात.

दुसऱ्या व्हिडीओत एक मुलगी हॉटेलात आल्यावर आदित्य रॉय कपूर सोबत सेल्फी घेताना दिसते. या व्हिडीओला पाहून चाहत्यांमध्ये आधी चिंतेचं वातावरण होतं पण खंर काय ते कळल्यावर मात्र उत्सुकता वाढली आहे.

एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,'किती छान झालं असतं जर मी या हॉटेलमध्ये राहिलो असतो'.

Aditya Roy Kapur
The Romantics: 'सेक्सनंतर..','द रोमॅंटिक्स' सीरिजमध्ये हे काय बोलून गेलेयत ऋषी कपूर,नीतू कपूरही लाजून लाल

आदित्य रॉय कपूरच्या या व्हायरल व्हिडीओवर खूप संमिश्र प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत.

एका नेटकऱ्यानं कमेंट बॉक्समध्ये लिहिलं आहे की-'भाई..तुझ्यावर एवढे वाईट दिवस का आले?', तर आणखी एकानं लिहिलं आहे -'इतका हॅंडसम मॅनेजर..'

तर काहींनी व्हिडीओ नेमका का पोस्ट केलाय हे समजून घेऊन कमेंट केल्या आहेत.

आदित्य रॉय कपूरच्या आगामी सीरिज निमित्तानं प्रमोशनसाठी हा व्हिडीओ पोस्ट केलाय म्हणत अनेकांनी अभिनेत्याला शुभेच्छा दिल्यात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com