Kartik Aaryan: 'शहजादा'चा ट्रेलर उद्या होणार रिलीज, कार्तिक आर्यनने शेअर केली पोस्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kartik Aaryan

Kartik Aaryan: 'शहजादा'चा ट्रेलर उद्या होणार रिलीज, कार्तिक आर्यनने शेअर केली पोस्ट

अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या आगामी 'शहजादा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाशी संबंधित नवीन माहिती म्हणजे या चित्रपटाचा ट्रेलर उद्या लाँच होणार आहे. याची माहिती स्वतः कार्तिक आर्यनने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून दिली आहे. चित्रपटातील त्याचा लूक शेअर करताना कार्तिकने लिहिले, 'शेहजादा आ रहा है. उद्या ट्रेलर लाँच होणार आहे.

शेअर केलेल्या पोस्टरमध्ये कार्तिक आर्यन तोंडात सिगारेट घेऊन स्कूटरवर बसलेला दिसत आहे. कार्तिक आर्यनच्या पोस्टवर चाहते आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. एका यूजरने लिहिले, 'प्रिन्स रिटर्न्स.' आणखी एका यूजरने लिहिले की, 'जर पोस्टर इतके मस्त असेल तर चित्रपटही अप्रतिम असेल.' एका यूजरने लिहिले की, 'बॉक्स ऑफिसवर इतिहास रचण्यासाठी कार्तिक आर्यन पुन्हा परतला आहे.' एका यूजरने लिहिले की, 'आम्ही चित्रपट, ट्रेलर आणि गाण्यांसाठी खूप उत्सुक आहोत.'

हेही वाचा: Golden Globe: 'नाटू नाटू'फेम केरावानीं आधी या भारतीय संगीतकाराला मिळाला आहे गोल्डन ग्लोब..

'शेहजादा' हा अल्लू अर्जुनच्या अलवैकुंठपुरम चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित धवन करत आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत क्रिती सेननही दिसणार आहे. याशिवाय परेश रावल, मनीषा कोईराला आणि रोनित रॉय हे स्टार्सही दिसणार आहेत. हा एक अॅक्शन मनोरंजन करणारा चित्रपट आहे. हा चित्रपट 10 फेब्रुवारी 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

याआधी असा दावा केला जात होता की, 'शेहजादा'चा ट्रेलर शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटासोबत थिएटरमध्ये प्रदर्शित केला जाईल. मात्र, आता 'पठाण' रिलीज होण्यापूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च होणार आहे. कार्तिक 'शेहजादा'मध्ये अॅक्शन अवतारात दिसणार आहे.