
Kartik Aaryan च्या खिशात सलमानच्या फेव्हरेट निर्माता-दिग्दर्शकाचा सिनेमा
बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन(Kartik Aaryan) संदर्भातली एक मोठी गोष्ट समोर येत आहे. त्याचे काही सिनेमे पाइपलाइनमध्ये असतानाच त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा झालेली आहे. त्याच्या हातात एक मोठा प्रोजेक्ट लागल्याचं बोललं जात आहे. कार्तिकने या मोठ्या प्रोजेक्टसाठी सलमानच्या(Salman) दोन फेव्हरेट निर्माता-दिग्दर्शकाला आपल्या खिशात टाकल्याचं बोललं जात आहे. चला जाणून घेऊया,सलमानचे ते दोन फेव्हरेट कोण आहेत ज्यांनी कार्तिकशी हातमिळवणी केली आहे.(Kartik Aaryan Signs Salman's Favourite Director-Producer Movie).
हेही वाचा: दोन सख्ख्या भावांशी सारा-जान्हवीचं जुळलेलं सूत,दोघे करण जोहरचे सख्खे शेजारी
बोललं जात आहे की,कार्तिकनं आपल्या आगामी मोठ्या प्रोजेक्टसाठी प्रसिद्ध दिग्दर्शक कबीर खान (Kabir Khan) आणि निर्माता साजिद नाडियादवालासोबत हात मिळवला आहे. कबीर खाननं याआधी 'एक था टायगर' आणि 'बजरंगी भाईजान' सारखे सिनेमे बनवले आहेत. कार्तिकसोबत करत असलेल्या या नव्या सिनेमाचं नाव अद्याप निश्चित करण्यात आलेलं नाही.
हेही वाचा: Koffee with karan 7:सारानं केलं कन्फर्म, कार्तिकशी अफेअर- ब्रेकअपचा खुलासा?
'भूलभूलैय्या २' ला मिळालेल्या यशानंतर कार्तिक आर्यनला मोठी खूशखबर मिळाली आहे. बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता साजिद नाडियादवालानं एक रोमॅंटिक जोडी आपल्या आगामी सिनेमासाठी कास्ट केली आहे. त्यानं मुख्य अभिनेता म्हणून कार्तिक आर्यनला निवडलं आहे तर या प्रोजेक्टसाठी कबीर खान सहनिर्मितीची जबाबदारी उचलत दिग्दर्शितही करणार आहे.
हेही वाचा: Saif Ali Khan चा मुलगा अन् अर्जुन रामपालची मुलगी, 'त्या' फोटोची रंगली चर्चा
दुसरीकडे मोठी गोष्ट आहे की अद्याप टायटल न ठरलेला हा सिनेमा कबीर खान आणि साजिद नाडियदवालाच्या जोडीला पुन्हा एकत्र घेऊन आला आहे. असं देखील बोललं जात आहे की,कार्तिकनं याआधी साकारलेल्या भूमिकांपेक्षा हा रोल खूपच वेगळा आहे. या सिनेमातला कार्तिकचा लूक हा खूपच वेगळा असल्याचं देखील म्हटलं जात आहे.
हेही वाचा: Priyanka Chopra: '4' मजेदार गोष्टी घडल्यावर जुळलं होतं प्रियंका-निकचं सूत
कार्तिक आर्यनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गूड न्यूज चाहत्यांना दिली आहे. त्यानं फोटो शेअर करीत कॅप्शन दिलं आहे की, ''हे माझ्यासाठी खूपच खास आहे. माझा फेव्हरेट दिग्दर्शक कबीर खान आणि निर्माते साजिद नाडियादवाला यांच्यासोबत मी नव्या प्रवासावर सिनेमाच्या माध्यमातून निघत आहे,मी खूपच उत्सुक आहे त्यांच्यासोबत काम करण्यासाठी''.
कार्तिक आर्यन आपल्याला 'शहजादा' सिनेमातूनही लवकरच दिसणार आहे.
त्यानं इन्स्टाग्रामवर आपला एक फोटो शेअर करत 'शहजादा'ची रिलीज डेट शेअर केली आहे. हा सिनेमा १० फेब्रुवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.
Web Title: Kartik Aaryan Signs Salmans Favourite Director Producer
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..