Priyanka Chopra: '4' मजेदार गोष्टी घडल्यावर जुळलं होतं प्रियंका-निकचं सूत Priyanka Chopre | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Priyanka chopra-Nick Jonas

Priyanka Chopra: '4' मजेदार गोष्टी घडल्यावर जुळलं होतं प्रियंका-निकचं सूत

बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा(Priyanka chopra) आता एक ग्लोबल आयकॉन बनली आहे. तिनं आपल्या मेहनतीच्या बळावर यश संपादन केलं आहे. तिच्या या प्रवासात अमेरिकन सिंगर निक जोनसनं(Nick Jonas) तिचा जीवनसाथी बनून तिला उत्तम साथ दिली आहे. हे कपल नेहमीच चर्चेत पहायला मिळतं. सोशल मीडियावर तर नेहमीच प्रेमात आकंठ बुडालेले त्यांचे फोटो पाहून सगळ्यांनाच हेवा वाटतो. लोकांना आतापर्यंत माहित आहे की,हे दोघे मेटा गालाच्या दरम्यान भेटले होते, पण हे ऐकल्यावर आपण सगळै हैराण व्हाल की यांचा संवाद ट्वीटरहून सुरू झाला होता. यानंतर जे काही झालं त्याचे आपण सगळेच साक्षीदार आहोत.(How Did Priyanka Chopra and Nick Jonas First Meet? 4 interesting things of their lovelife)

हेही वाचा: Saif Ali Khan चा मुलगा अन् अर्जुन रामपालची मुलगी, 'त्या' फोटोची रंगली चर्चा

1. मेटा गाला आधीच प्रियंका-निक मध्ये सुरु झाला होता संवाद

कितीतरी लोकांचे म्हणणे आहे की मेटा गालामध्ये भेटल्यानंतर प्रियंका आणि निक यांच्यात प्रेमांच नात फुललं,पण प्रत्यक्षात ते खरं नाही. दोघं मेटा गाला(Meta Gala) आधी काही महिन्यांपूर्वी पासून एकमेकांना ओळखू लागले होते. जेव्हा निक ने ट्वीटरच्या(Twitter) DM वर प्रियंकाला मेसेज केला होता.

२. निकनं असा मिळवला होता लेडी लवचा नंबर

जेव्हा निकने प्रियंकाला ट्वीटरवर मेसेज केला तेव्हा अभिनेत्रीनं त्याला आपल्याकडून प्रतिसाद दिला. तिनं निकला ट्वीटरच्या डीएम ऐवजी टेक्स्ट मेसेज करायला सांगितला आणि चक्क आपला नंबर त्याच्यासोबत शेअर केला.

३. 'या' ठिकाणी झाली होती पहिल्यांदा भेट

मीडियाला मिळालेल्या वृत्तानुसार, निक आणि प्रियंका यांची पहिली भेट २०१७ सापी वॅनिटी फेयर ऑस्कर पार्टीत झाली होती. याच पार्टीत प्रियंकाला पहिल्यांदा निकने पाहिलं होतं आणि प्रियंकासमोर गुडघ्यांवर बसून म्हटलं होतं,''आतापर्यंत तू कुठे होतीस?''

४. तीन भेटीनंतर घेतलेला लग्नाचा निर्णय

सगळ्यात इंट्रेस्टिंग गोष्ट आहे की प्रियंकाला तीन वेळा डेट केल्यानंतर निकनं तिच्याशीच लग्न करायचं असा निर्णय घेतला होता. त्यानं आपल्या आईला फोनवरनं सांगितलं की त्याला प्रियंका चोप्राच जीवनसाथी म्हणून त्याच्या आयुष्यात हवी आहे. त्यानंतर भारतात हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीनं त्यांचं ग्रॅंड वेडिंग राजस्थानच्या महालात पार पडलं.

हेही वाचा: १५ दिवसांपासून सोशल मीडियावरनं गायब आहे समंथा,चाहत्यांनी केली कारणांची यादी

आपल्यापैकी कदाचित कमी जणांना माहित असेल की प्रियंका चोप्राला एरोनेटिकल इंजिनिअर बनायचं होतं. हो, मिस. वर्ल्डचा खिताब जिंकण्याआधी प्रियंकाची स्वप्न काही वेगळीच होती. पण नशीबाला काही वेगळंच मंजूर असावं बहुधा. मिस.वर्ल्ड बनल्यानंतर प्रियंकानं थेट अभिनयात पदार्पण केलं आणि त्यालाच आपलं आयुष्य बनवलं.

प्रियंकाना बॉलीवूडमधनं नाही तर साऊथ इंडस्ट्रीतून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. २००२ मध्ये तिचा प्रदर्शित झालेला पहिला तामिळ सिनेमा म्हणजे 'Thamizhan'. या सिनेमात ती साऊथ स्टार विजय सोबत दिसली होती. त्यानंतर २००३ मध्ये तिने 'द हिरो: लव्ह स्टोरी ऑफ ए स्पाय' मधनं बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं.

हेही वाचा: इटलीतला साराचा फनी व्हिडीओ, न्हाव्यालाच केस कापायचं ट्रेनिंग देताना दिसली

बॉलीवूड ते हॉलीवूड पर्यंत प्रियंका चोप्रानं खूप संघर्ष केला आणि आज ती ज्या उंचीवर आहे तिथे पोहोचली. या प्रवासात स्वतःची प्रॉडक्शन कंपनी पर्पल पेबपिक्चर्स सुरु करण्यामागे तिचा केवळ नवीन टॅलेंटला एक प्लॅटफॉर्म देण्याचा हेतू होता. तिनं या माध्यमातून लोकल टॅलेंटला खूप प्राधान्य दिल्याचं दिसून आलं. तिच्या प्रॉडक्शन हाऊसतर्फे काही मराठी सिनेमांची देखील तिनं निर्मिती केली.

प्रियंका भले परदेशात राहत असली,तरी तिची पाळमुळं मात्र आजही आपल्या भारताशी जोडलेली आहेत. बोललं जातं की तिला आपल्या जेवणात लोणचे लागतेच. एकदा तिनं स्वतः सांगितलं होतं की,ती खूप देसी आहे,आणि ती जिथे जाते तिथे तिचं खास बनवलेलं लोणचं तिच्यासोबत असतं.

Web Title: How Did Priyanka Chopra And Nick Jonas First Meet 4 Interesting Things Of Their Lovelife

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top