सोनाक्षीला जायचंय अज्ञातवासात;म्हणाली,'मला माणसांपासून लांब राहायचंय' Sonakshi Sinha | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sonakshi Sinha

सोनाक्षीला जायचंय अज्ञातवासात;म्हणाली,'मला माणसांपासून लांब राहायचंय'

'दबंग गर्ल' सोनाक्षी सिन्हा(Sonakshi Sinha) आता तशी सिनेमात कमी दिसते. पण तिने जे काही सिनेमे केलेयत त्यातनं तिचं अस्तित्व दिसून आलेलं. म्हणजेच काय तर तिची अॅक्टिंग अगदीच उजवी नाही म्हणता येणार पण अगदीच टुकारपण नाही म्हणता येणार, तिचा अभिनय,डान्स सगळं ठीकठाक,पण मग गाडी अडली कुठे,बाई सिनेमातनं कमी का दिसतात याचं उत्तर एका मुलाखतीच्या माध्यमातनं समोर आलंय. त्यातच तिनं काही अशा खूप पर्सनल गोष्टींचा खुलासा केला की ज्यामुळे तिचं सिनेमांपासून दूरी बनवून ठेवण्याचं उत्तर आपोआप मिळालं.

हेही वाचा: तनिषा मुखर्जीचं 'शुभमंगल सावधान'?फोटोवर ट्रोलर्स म्हणाले,'म्हातारी..'

वेलनेस ब्रॅंडच्या त्या मुलाखतीत सोनाक्षीला मुलाखत घेणारीनं विचारलं,'तुला माणसांपासून किंवा कोणत्या एखाद्या गोष्टीपासून दूर राहायला आवडेल?' तर ती म्हणाली,'डेफिनेटली माणसांपासून'. अच्छा तर ये बात है. सोनाक्षी मॅडमना माणसं फार आवडत नाहीत म्हणायची. आणि सिनेमा म्हटलं की माणसं आलीच मोठ्या संख्येनं आजूबाजूला. आता बाईंचा अज्ञातवासाच जायचा विचार असं आम्ही म्हटलं तर मग बिघडलं कुठे. बॉलीवूडपासनं थोडी फारकत घेतलेल्या सोनाक्षीला सहकलाकार म्हणून अक्षय कुमार जाम आवडतो याचीही कबुली तिनं या मुलाखतीत दिली. आता आणखी एका प्रश्नाचं उत्तर देताना तिनं सांगितलं की ती गोष्ट माझ्या आयुष्यात नसेल तर मला अजिबात चालणार नाही इतकं प्रेम आहे माझं त्या गोष्टीवर.

तिची मुलाखत इथे जोडलेली आहे. ज्यात तिला काही रॅपिड प्रश्न विचारण्यात आले होते. ज्यावर तिनं आपली मतं स्पष्ट मांडली आहेत. त्या मुलाखतीत तिच्यासोबत हॉलीवूड स्टार ख्रीस हेम्सवॉर्थनेही सहभाग घेतला होता.

तिला विचारलं गेलं, ''तुला ब्रेकफास्ट टेबलवर कोणती गोष्ट हवीच असते?'' तर ती म्हणाली,''एकवेळ पाणी नसेल तर चालेल पण अंड नसेल तर मात्र मी वेडीपिशी होते''. 'संडे हो या मंडे,रोज खाओअंडे' या वाक्याला तिनं फारच मनावर घेतलंय म्हणायचं बुवा. दुसरी आणखी एक इंट्रेस्टिंग गोष्ट सोनाक्षी म्हणाली त्यामुळे नक्कीच तिचं कौतूक करावं तेवढं थोडं. लॉकडाऊनमध्ये सोनाक्षी सिन्हा अॅम्ब्रॉडरी करायला शिकलीय असं ती म्हणाली. ज्याचं तिच्यासोबत त्या मुलाखतीत सामील झालेल्या हॉलीवूड स्टार ख्रीस हेम्सवॉर्थनेही 'वॉव' म्हणत कौतूक केलंय. वाह! सोनाक्षी मॅडम फिल्म करत नाही तर नाही पण पैसा आहे तर अशा कला शिकताय ते बरंय एक.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top