we will not hand it over to youngstars - Salman Khan. माणसं जातात पण त्यांनी सोडलेली त्यांची छाप कायम राहते. मेहनत करा,फुकट काहीही मिळत नाही.Antim Film Promotion Interview | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

salman Khan

सलमान म्हणाला,''असेल हिंमत तर करून दाखवा''

सलमान खान म्हणजे बॉलीवूडचा सलमान भाई. गेली अनेक वर्ष तो बॉलीवूडवर राज्य करतोय असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये. त्याच्या अभिनयापेक्षा त्याच्या दिसण्याचे आणि रांगड्या व्यक्तीमत्त्वाचे फॅन जगभरात आहेत. त्यातच त्याचा दिलदार स्वभावही त्याची फॅनलिस्ट वाढवण्यात कारणीभूत ठरलेला. हो,पण गेल्या काही वर्षात त्याने दारुच्या नशेत गाडी चालवून केलेले अपघात आणि घेतलेले मानवी जीव असोत,काळवीट शिकार प्रकरण असो की अगदी त्याचे गुन्हेगार जगताशी असलेल्या संबंधांवरुन निघालेले वाद असोत या सर्वांचा सलमानच्या करिअरवर कधीच कोणता परिणाम झालेला नाही. त्यानं त्याचं स्टारपद कायम राखून ठेवलं.

हेही वाचा: रुबिना दिलैक लवकरच देणार गुडन्यूज!

सध्या सलमान खान त्याच्या २६ नोव्हेंबरला प्रदर्शित होणा-या 'अंतिम-द फायनल ट्रुथ' या सिनेमाच्या निमित्तानं प्रमोशन करण्यात बिझी आहे. तेव्हा एका कार्यक्रमादरम्यान त्याला विचारलं गेलं की,'ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे नवनवीन कलाकार,लेखक इंडस्ट्रीला मिळत आहेत आणि खूप चांगलं त्यांचं भविष्य दिसतंय. पण यामुळे तुमचं भविष्य,तुमचं स्टारपद धोक्यात येईल असं नाही का वाटत?' तेव्हा सलमानने आपल्या नेहमीच्याच कडक भाषेत या प्रश्नाचं उत्तर दिलं. कोणाला न दुखावता,नव्या कलाकारांना सल्ला देताना तो हे सांगायला विसरला नाही की,'आपलं कोणीही काही करू शकत नाही. आपलं स्टारपद अबाधित राहणार.' हे उत्तर देऊन सलमानने एकार्थाने या उत्तरात नव्या पिढीला इशाराही दिलाय.

सलमान म्हणाला,''एका कलाकाराचा त्याच्या चाहत्यांवर असलेला पगडा हा कधीच संपत नसतो. त्याच्या चाहत्यांच्या मनात तो कायम घर करून राहतो. गेले कित्येक दशकांपासून हे सुरू आहे. नवे लोक येतात पण आधी ज्यांनी नाव कमावलंय त्यांना त्याचा फटका कधी बसत नाही. मी सु्द्धा हे अनुभवतोय. मला कोणाच्या येण्याने काही फरक पडला नाही. आज पन्नासहून अधिक वय झालं तरी मी मेहनत घेतोय,काम करतोय. आमच्या जनरेशनने जे मेहनत करून कमावलंय ते असं सहजासहजी आम्ही कोणाला हडपू देणार नाही. आजच्या पिढीतील तरुणांनी त्यांची-त्यांची मेहनत करावी आणि आपलं स्थान निर्माण करावं. आम्ही इथून जाऊ आणि मग ते आपलं स्थान पक्कं करतील असं होणार नाही. आम्ही प्रेक्षकांवर सोडलेली छाप इथेच राहणार पुढची अनेक दशकं. कारण काम,कष्ट शेवटी महत्त्वाचे. नवीन पिढीला त्यांचं स्टारडम नक्की मिळेल,त्यांनी चांगले सिनेमे निवडावेत,आपलं वागणं चांगलं ठेवावं, स्टारडम आपोआप चालून येईल असंही सलमान म्हणाला.

हेही वाचा: सारा म्हणाली,''मला तो दोन्ही रुपात आवडतो"

महेश मांजरेकर दिग्दर्शित सलमानच्या 'अंतिम-द फायनल ट्रुथ' सिनेमात त्याच्यासोबत आयुष शर्मा हा त्याचा मेव्हणा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'मुळशी पॅटर्न' या मराठीत गाजलेल्या सिनेमाचा हा रीमेक आहे. त्यामुळे हिंदी सिनेमाला दिलेला रीमेकचा टच प्रेक्षकांना किती आवडतोय याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.

loading image
go to top