Box Office Report: बॉक्स ऑफिस गारठलं! ना '72 हुरें' ना विद्याचा 'नियत'..चालतोय फक्त 'हा' सिनेमा

kartik kiara film satyaprem ki katha  second friday neeyat and  72 hoorain   Box Office Collection viral
kartik kiara film satyaprem ki katha second friday neeyat and 72 hoorain Box Office Collection viral Esakal
Updated on

Box Office Report: बॉलिवूडमधील चित्रपटांना सध्या बॉक्स ऑफिसवर फारच कमी प्रतिसाद मिळत आहे. काही क्वचित चित्रपट सोडले तर बऱ्याच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर खुपच कमी कमाई केली. 'द केरळ स्टोरी' आणि विकीचा 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.

आता सध्या बॉक्स ऑफिसवर तीन चित्रपट रिलिज झाले आहेत. त्यातच आहे '72 हुरें' , 'नियत' आणि कर्तिक-कियाराचा 'सत्यप्रेम की कथा' आता या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कशी कमाई केली आहे. याचे आकडेही समोर आले आहे.

kartik kiara film satyaprem ki katha  second friday neeyat and  72 hoorain   Box Office Collection viral
Ramayana: आदिपुरुषच्या वादानंतर 'रामायण'मधुन आलियाचा पत्ता कट? 'ही' साउथ अभिनेत्री बनणार सिता

'72 हुरें' आणि 'नियत' हे चित्रपट या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर रिलज झाले. नियत मधुन विद्या बालनने दीर्घ काळानंतर पडद्यावर पुनरागम केले आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाची कमाई चांगली होती. मात्र, वीकेंडला मिळणाऱ्या कमाईत मोठी घसरण झाली.

नियात

शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या 'नियात'चा बजेट 35 कोटींचा होता. पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1.02 कोटी कमावणाऱ्या चित्रपटाने दोन दिवसांत 2.52 कोटी रुपयांचा गल्ला जमावला.

kartik kiara film satyaprem ki katha  second friday neeyat and  72 hoorain   Box Office Collection viral
Pravin Tarde: ईथे वर्षभर शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही, टोमॅटो भाववाढीचं प्रवीण तरडेंनी केलं समर्थन

72 हूरें

तर दुसरीकडे '72 हूरें' बद्दल बोलायचं झालं तर सकनिल्‍कच्‍या रिपोर्टनुसार, शनिवार 8 जुलै रोजी चित्रपटाने केवळ 45 लाखांची कमाई केली आहे. अशा परिस्थीतीत या चित्रपटाने दोन दिवसांत एक कोटींचा गल्ला जमावला आहे.

kartik kiara film satyaprem ki katha  second friday neeyat and  72 hoorain   Box Office Collection viral
Karan Johar AMA Session: भावा तू 'गे' आहेस का? चाहत्याने प्रश्न विचारताच करणच्या उत्तरानं केलं सर्वांना हैराण

सत्यप्रेम की कथा

तर कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांची प्रेमकथा असलेला 'सत्यप्रेम की कथा' प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी झाला आहे. पहिल्या दिवशी 'सत्यप्रेम की कथा' ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 9.25 कोटींची ओपनिंग केली.

चित्रपटाचे बजेट 50 कोटींच्या आसपास होतं. आकडेवारीनुसार चित्रपटाने 10 व्या दिवशी 4 कोटींचा व्यवसाय केला आहे, ज्यामुळे चित्रपटाचे एकूण कलेक्शन 60 कोटींच्या आसपास झाले आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवरील चित्रपटांच्या कमाईच्या तुलनेत 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाने मजल मारली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com