Karwa Chowth: 'जिकडं चंद्र दिसतोय तिकडं विमान वळव'! पायलट हँग' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Karwa Chowth

Karwa Chowth: 'जिकडं चंद्र दिसतोय तिकडं विमान वळव'! पायलट हँग'

Karwa Chowth 2022: बॉलीवूडमध्ये करवा चौथ हा एक वेगळा सेलिब्रेशन फेस्टिव्हल आहे. यामध्ये वेगवेगळ्या सेलिब्रेटी सहभागी होतात. यावेळी बऱ्याच अभिनेत्रींचा पहिला करवा चौथचा उपवास असणार आहे. यामध्ये आलिया भट्ट, मौनी रॉय, कतरिना कैफ यांची नावं सांगता येतील. यासगळ्यात बॉलीवूडच्या एका दिवंगत अभिनेत्रीचा किस्सा यानिमित्तानं अनेकदा सांगितला जातो. श्रीदेवी यांनी आपल्या करवा चौथचा उपवास सोडण्यासाठी पायलटकडे केलेली ती डिमांड त्यावेळी अनेकांसाठी धक्कादायक बाब होती.

त्याचं झालं असं की, श्रीदेवी आणि बोनी कपूर हे मेक्सिकोवरुन लॉस एंजेलिसला चालले होते. रात्रीची फ्लाईट होती. आणि तो करवा चौथचा दिवस होता. असं म्हटलं जातं की, हे व्रत करत असताना पतीच्या हातून पाणी घेऊन आणि चंद्राचे दर्शन घेऊन व्रत सोडले जाते. मग उपवास सोडला जातो. आता तेव्हा त्या विमानातून चंद्र काही दिसत नव्हता. अशावेळी श्रीदेवी यांनी त्या पायलटकडे जाऊन त्याला जे सांगितलं याची चर्चा नेहमीच होत राहिली. त्यांनी त्याला ज्या बाजूला चंद्र दिसतो तिकडे विमान वळवायला सांगितले होते.

त्या पायलटला काय करावे असा प्रश्न पडला होता. मात्र एवढ्या मोठ्या अभिनेत्रीनं सांगितलं म्हटल्यावर त्यांना नाही कसे म्हणावे यामुळे तो चिंतेत होता. पायलटनं श्रीदेवी यांच्या त्या अजब मागणीला न्याय दिला. आणि ज्या बाजुला चंद्र दिसतो त्याबाजुने विमान वळवले होते. श्रीदेवी यांनी हा किस्सा एका मुलाखतीतून सांगितला होता. त्यावेळी श्रीदेवी यांनी चंद्र पाहिल्यानंतर आपला उपवास सोडला होता.

हेही वाचा: Aamir Khan Advt: 'आमिरनं लाज सोडली'! 'घरजावई' जाहिरातीवरुन नेटकऱ्यांचा भडका

श्रीदेवी जेव्हा इंग्लिश विंग्लिश चित्रपटाच्या शुटींगसाठी अमेरिकेला गेली होती. त्यावेळी देखील तिनं तिथं करवा चौथचे व्रत केले होते. 24 फेब्रुवारी 2018 रोजी तिचे दुबईतील एका हॉटेलमध्ये निधन झाले. तिच्या निधनानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. तिचा मृत्यु हा नेहमीच चाहत्यांसाठी अनाकलनीय विषय होता.

हेही वाचा: Double XL Trailer: 'मुलांना ब्रा मोठी हवी पण कंबर बारीक'!