esakal | 'क्रूर सासूबाई' म्हणत कश्मीरा शाहने गोविंदाच्या पत्नीला सुनावलं |Kashmera Shah
sakal

बोलून बातमी शोधा

'क्रूर सासूबाई' म्हणत कश्मीरा शाहने गोविंदाच्या पत्नीला सुनावलं

'क्रूर सासूबाई' म्हणत कश्मीरा शाहने गोविंदाच्या पत्नीला सुनावलं

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अभिनेता गोविंदा Govinda आणि त्याचा भाचा कॉमेडियन कृष्णा अभिषेक Krushna Abhishek यांच्यातील कौटुंबिक वाद अजूनही शमला नाही. काही दिवसांपूर्वी गोविंदाने पत्नी सुनिता अहुजासोबत Sunita Ahuja 'द कपिल शर्मा शो'मध्ये हजेरी लावली होती. तेव्हा कृष्णाने शोमध्ये येण्यास स्पष्ट नकार दिला होता. आता कृष्णाची पत्नी कश्मीरा शाह Kashmera Shah आणि सुनिता यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरू झाली आहे. "जेव्हापासून आम्ही घरात वाईट सून आणली, तेव्हापासून हा वाद सुरू झाला", असं विधान गोविंदाच्या पत्नीने केलं होतं. त्यावर आता कश्मीराने सडेतोड उत्तर दिलं आहे.

कश्मीराचं ट्विट-

'मी काही कामानिमित्त अमेरिकेला गेले होते आणि नुकतेच परत आले. काही लोक आमच्या कौटुंबिक वादात हात धुवून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं मी वाचलं. त्याबद्दल वाचताना मला माझ्या मुलाने विचारलं की वाईट सून म्हणजे कोण? त्याला मी उत्तर दिलं, वाईट सून म्हणजे तीच जिला क्रूर सासूबाई मिळते', असं ट्विट करत कश्मीराने उत्तर दिलं. या ट्विटमध्ये तिने चेकमेट असा हॅशटॅग वापरला आहे.

हेही वाचा: मंदाकिनीसारखा अंघोळीचा सीन करणार का? ट्विंकलने दिलं सडेतोड उत्तर

गोविंदासोबतच्या वादावर कृष्णा एका मुलाखतीत म्हणाला होता, "मला असं कळलंय की कपिल शर्माच्या एपिसोडमध्ये माझे मामा आणि त्यांची पत्नी हजेरी लावणार आहेत. त्यामुळे मी त्या एपिसोडमध्ये काम करण्यास नकार दिला आहे. मला असं वाटतं की त्यांची पण हीच इच्छा असेल की मी तिथे नसावं. कारण हा एक कॉमेडी शो आहे. एखादी वादग्रस्त गोष्ट तोंडून निघून गेली ऐनवेळी तर पुन्हा चर्चा सुरु होईल. मला पुन्हा वाद सुरू करायचा नाही. गोविंदाजी स्टेजवर असताना मी कॉमेडी करावी अशी प्रेक्षकांची इच्छा असेल. पण त्या एपिसोडमध्ये मी हजेरी न लावणंच योग्य आहे."


गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात गोविंदाने कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली होती. तेव्हासुद्धा कृष्णाने त्या एपिसोडमध्ये काम करण्यापासून माघार घेतली. कृष्णाची पत्नी कश्मीराने केलेल्या एका ट्विटनंतर दोन कुटुंबीयांमध्ये वाद सुरू झाला. 'पैशांसाठी लोकं नाचतात', असं तिने तिच्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. तेव्हापासून गोविंदा आणि कृष्णामध्ये अनेकदा शाब्दिक बाचाबाची झाली.

loading image
go to top