काश्मीर फाईल्सच्या दिग्दर्शकानं 'जे केलं ते...', पाहा बॉलीवूड सेलिब्रेटींच्या प्रतिक्रिया

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाईल्सला (Bollywood News) आता धार्मिक आणि वंशिक रंग येत चालल्याचे दिसून आले आहे.
The Kashmir Files
The Kashmir Files esakal

The Kashmir Files News: विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाईल्सला (Bollywood News) आता धार्मिक आणि वंशिक रंग येत चालल्याचे दिसून आले आहे. त्यातून अनेक ठिकाणी वाद झाले आहे. काही राज्यांतील वातावरण (Bollywood movies) संवेदनशीलही झाले आहे. राजस्थान, ओरिसा, हैद्राबाद, उत्तर प्रदेश याठिकाणी या चित्रपटावरुन वाद झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे प्रशासनानं कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. राजस्थानातील कोटा जिल्ह्यात तर कलम 144 लागू करण्यात आले आहे. त्यावरुन दिग्दर्शक अग्निहोत्री भडकले होते. त्यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्य़ाची तक्रार ही वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांकडे केल्याचे दिसून आले आहे. बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी अग्निहोत्रींवर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले आहेत. ते काय म्हणालेत हे आपण जाणून घेणार आहोत.

प्रकाश राज -

टॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज हे त्यांच्या वेगळेपणा आणि परखड भूमिकेसाठी ओळखले जाणारे सेलिब्रेटी आहेत. त्यांनी काश्मीर फाईल्ससाठी आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका व्हिडिओच्या माध्यमातून ते व्यक्त झाले आहेत. त्यात ते म्हणतात, काश्मीर फाईल्सची निर्मिती केली. झाली का त्यातून लगेच सगळी भरपाई, लोकांच्या जखमांना पुन्हा चिघळवण्यात काय अर्थ आहे, लोकांमध्ये व्देषभाव पसरविण्यात येत आहे. हे आपल्याला खरचं कळत नाही का, असा प्रश्न राज यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

prakash raj
prakash raj esakal

नंदिता दास - गोध्रा हत्यांकांडावर प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शिका नंदिता दासनं फिराकची निर्मिती केली होती. 20 मार्च 2009 मध्ये तिचा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तिनं काश्मीर फाईल्सच्या निमित्तानं लोकांना फिराक पाहण्याचे आवाहन केले आहे. सध्या युट्युबवर हा चित्रपट उपलब्ध असल्याचे तिनं सांगितलं आहे. गुजरातमध्ये जी दंगल झाली होती त्यावर आधारित हा चित्रपट आहे. त्यावरुन मोठा गदारोळ झाला होता.

nandita das
nandita dasesakal

आदिल हुसैन

बॉलीवूड अभिनेता आदिलनं दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. त्यानं लिहिलं आहे की, आपल्याला खरं बोललं पाहिजे. आपण जे काही बोलू ते प्रामाणिकपणे मांडलं आहे. तरचं ते लोकांना पटेल. नाहीतर आपल्या सांगण्यातील सौंदर्य कोमेजून जाईल. सध्या जे काही चालले आहे त्यातून आपण समाजातील वातावरण दुषित तर करत नाही ना, असा प्रश्न हुसैन यांनी उपस्थित केला होता. त्यांच्या त्या व्टिटला जोरदार विरोध झाला.

swara bhaskar
swara bhaskar esakal

स्वरा भास्कर -

प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर हिनं देखील काश्मीर फाईल्सवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिनं नेहमीप्रमाणं निर्माते आणि दिग्दर्शक अग्निहोत्री यांच्यावर टीका केली आहे. तिनं अग्निहोत्री याचं नाव न घेता त्यांच्यावर राग व्यक्त केला आहे. तुम्ही ज्याची निर्मिती केली आहे त्यातून जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला मोठं यश मिळालं आहे तर तसं नाही. गेल्या पाच वर्षांपासून जी लोकं आपल्या मनात व्देष पसरवण्याचे काम करत आहेत. तेच काम तुम्ही देखील केलं आहे. अशी प्रतिक्रिया स्वरानं दिली आहे.

Adil hussain
Adil hussain

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com