
Rajiv Gandhi हत्याकांडातील दोषी सोबत थिरकला बाहुबलीचा कटप्पा, चर्चेला उधाण
Bahubalui मधील 'कटप्पा'ची भूमिका साकारुन रातोरात स्टार झालेले अन् सगळ्यांच्या मनात आपली जागा निर्माण करणारे अभिनेता सत्यराज (Sathyaraj)सध्या बरेच चर्चेत दिसत आहेत. त्याचं झालं असं की, राजीव गांधी(Rajiv Gandhi) हत्याकांडातील दोषी पेरारिवलन तर्फे आयोजित एका कार्यक्रमात बाहुबली कटप्पा म्हणजेच सत्यराज सामिल झाले होते. (Katappa’ of ‘Bahubali’ danced fiercely with the convict of Rajiv Gandhi assassination, many leaders also came on this occasion)
हेही वाचा: Arpita च्या घरात सापडले सेक्स टॉईज,अभिनेत्री श्रीलेखाचा याविषयी मोठा खुलासा
त्यांनी पेरारिवलन सोबत स्टेजवर जोरदार ठेका धरल्याचं समोर आलं आहे. त्या कार्यक्रमातील काही फोटो-व्हिडीओ समोर आले आहेत.पेरारिवलनने हा कार्यक्रम आपल्या आई-वडीलांच्या वाढदिवसानिमित्तानं आयोजित केला होता. त्याने आयोजित केलेल्या कार्यक्रमात अनेक बडे नेते देखील सामिल झाले होते.
हेही वाचा: 40 आमदारांची पळवापळवी,'मी पुन्हा येईन' सिनेमात आधीच कशी दिसली?,गौप्यस्फोट..
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याकांडातील दोषी पेरारिवलने आपली आई अर्पुथम्मल आणि वडील कुयिल दासन यांच्या वाढदिवसा निमित्तानं एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानं आपल्या या सेलिब्रेशनचं निमंत्रण अनेक बड्या नेत्यांना दिलं होतं. बाहुबलीचा कटप्पा देखील या पार्टीत जोरदार डान्स करताना दिसला.
आपल्या माहितीसाठी इथे नमूद करतो की, राजीव गांधी हत्याकांडातील दोषी पेरारिवलन ३० वर्ष जेलमध्ये होता. त्यानंतर सु्प्रीम कोर्टानं त्याला सोडून देण्याचा निर्णय घेतला. जेलमधील लोकांसोबत पेरारिवलनचं चांगलं वर्तन दिसल्यामुळे ९ मार्च रोजी जामिनावर सुप्रीम कोर्टानं त्याची सुटका केली.
Web Title: Katappa Of Bahubali Danced Fiercely With The Convict Of Rajiv Gandhi Assassination Many Leaders Also Came On This
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..