अजून लग्नही नाही तोच....कतरिना विकीमध्ये भांडणं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vicky kaushal
अजून लग्नही नाही तोच....कतरिना विकीमध्ये भांडणं

अजून लग्नही नाही तोच....कतरिना विकीमध्ये भांडणं

बॉलीवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) हे दोघे त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून अशी शक्यता वर्तवली जातेय की, विकी कौशल आणि कतरिना कैफ डिसेंबर महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यातच चाहत्यांच्या नजरा विकी आणि कतरिना कैफवर खिळल्या आहेत. त्यांच्या लग्नाला आता अवघे काही दिवसच उरलेत. दोघांच्या लग्नाशी संबंधित वेगवेगळ्या गोष्टी रोज समोर येता आहेत. काही काळापूर्वी दिवाळीच्या मुहूर्तावर विकी आणि कतरिनाच्या गुप्त रोका सेरेमनीच्या चर्चा समोर आल्या होत्या. कबीर खान यांच्या घरी हा सोहळा झाल्याचे बोलले जात होते.

हेही वाचा: 'बिग बी' यांची पान मसाला कंपनीला नोटीस; कारण...

लग्नाच्या या सर्व चर्चा सुरू असतानाच विकी कौशल आणि कतरीना कैफ यांच्यात वाद झाल्याचं समोर आलं आहे. आता विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्यातील भांडणाची चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या या वादामुळे चाहत्यांना चांगलाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. असा दावा केला जातोय की, लग्नाच्या काही दिवस आधीच विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्यात वादावादी झाली आहे.

हेही वाचा: 'तुझ्यासमोर रणवीर पण फिका'; आकाश ठोसरचा लूक चर्चेत

रिपोर्टनुसार, रोका सेरेमनीची बातमी मीडियावर लीक झाल्यामुळे विकी आणि कतरिना यांच्यात खटके उडाले आहेत. असा दावा केला जातोय की, विक्की कौशलने रोका सेरेमनीची बातमी माध्यमांमध्ये पाहिली तेव्हा तो चांगलाच संतापला. यादरम्यान विकी आणि कतरिनामध्ये कडाक्याचं भांडण झाले. ही गोष्ट माध्यमांपर्यंत कशी पोहोचली आणि कोणाच्या बाजूने लीक झाली यावरून दोघांमध्ये बराच वाद झाला होता.

loading image
go to top