कॅतरिना व इशान प्रथमच एकत्र; एक्सेल एटरटेन्मेंटने केली 'फोन भूत' चित्रपटाची घोषणा

संतोष भिंगार्डे
Monday, 20 July 2020

कतरिना कैफने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत, तर सिद्धार्थ चतुर्वेदी 'गली बॉय' या चित्रपटामुळे स्टार झाला आहे. ईशान खट्टरची 'धडक' आणि 'उडता पंजाब' या चित्रपटातील कामगिरी दमदार होती.

मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ, अभिनेता सिद्धार्थ चतुर्वेदी आणि ईशान खट्टर हे त्रिकुट 'फोनभूत' या चित्रपटासाठी एकत्र आले आहे आणि ते प्रेक्षकांना आता हसविण्यास सज्ज झाले आहे. एक्सेल एण्टरटेन्मेंटने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. एक्सेल एण्टरटेन्मेंटने आतापर्यंत विविध विषयांवरील चित्रपट बनवून प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले आहे. 

ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह, ट्विटरवरुन दिली माहिती

गेल्या वर्षी 'गली बॉय' हा चित्रपट बनवला आणि आता 'तुफान' हा चित्रपट येत आहे. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी या कंपनीची स्थापना केली आहे आणि त्यांनीच 'फोनभूत' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट हॉरर कॉमेडी आहे. गुरमीत सिंह दिग्दर्शक आहेत. या चित्रपटाची कथा रवी शंकरन व जसविंदर सिंह बाथ यांची आहे. या वर्षाच्या शेवटी शूटिंग होणार आहे. सन 2021 मध्ये प्रदर्शित होण्याची आशा आहे. 

कांदिवली येथे रेल्वेची ट्रकला धडक; सुदैवाने मोठा अपघात टळला...

कतरिना कैफने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत, तर सिद्धार्थ चतुर्वेदी 'गली बॉय' या चित्रपटामुळे स्टार झाला आहे. ईशान खट्टरची 'धडक' आणि 'उडता पंजाब' या चित्रपटातील कामगिरी दमदार होती. त्यामुळे हे त्रिकूट एकत्र आल्यामुळे त्यांच्या कामगिरीकडे सगळ्यंचे लक्ष लागलेले आहे. 
---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: katrina kaif and ishan khattar will cone together for movie phone bhoot