'मुझसे शादी करोगी' म्हणत विकीने कतरीनाला केलं होतं प्रपोस,काय आहे किस्सा..

कतरिना आणि विकी कौशल यांचं प्रेम जुळण्यामागेही एक भन्नाट किस्सा आहे.
katrina kaif birthday : vicky kaushal propose katrina kaif in front of salman khan
katrina kaif birthday : vicky kaushal propose katrina kaif in front of salman khansakal

katrina kaif birthday : कतरिना कैफचं(Katrina Kaif) नाव बॉलीवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं. तिनं तिच्या करिअरमध्येही अनेक ब्लॉकबस्टर सिनेमातून काम केलं आहे. आणि आता विकी कौशलसोबत लग्न करुन ती मस्त आनंदात आपलं वैवाहिक आयुष्य जगत आहे. गेले काही दिवस ती प्रेग्नंट असल्याची चर्चा आहे. त्यामुळे चाहत्यांचे सगळे लक्ष कतरिनाकडे लागले आहेत. पण विकी आणि कतरिना या जोडीवर चाहते कायमच फिदा असतात. त्यांची लव्हस्टोरीही काहीशी भन्नाट आहे. एकदा तर विकिने उभ्या बॉलीवुड समोर कतरिनाला प्रपोज केलं होतं.. त्यामागेही एक भन्नाट किस्सा आहे.

(katrina kaif birthday : vicky kaushal propose katrina kaif in front of salman khan)

katrina kaif birthday : vicky kaushal propose katrina kaif in front of salman khan
चित्रपट फ्लॉप झाला.. पण कतरिना हीट झाली.. 'हा' आहे कतरिनाचा इतिहास..

2003 मध्ये बॉलीवुड मध्ये आलेल्या कतरिनाने हळूहळू बॉलीवुडमध्ये आपले नाव कामावलेच शिवाय दर्जेदार चित्रपट देऊन सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रीचाही मान मिळवला. तर तिचा पती विकी कौशल याला खरी ओळख मिळाली ते उरी या चित्रपटापासून. बॉलिवूडमधील एक वेगळ्या धाटणीचा अभिनेता म्हणून विकी कौशल हे नाव बरेच चर्चेत असते. विकीने मसान या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत प्रेक्षकांना आपलेसे केले. त्यामुळे चाहत्यांच्या या दोन लाडक्या व्यक्ती एकत्र आल्याने या कपलवर सर्वांचे विशेष प्रेम आहे. (katrina kaif age) (katrina kaif vicky kaushal wedding) (katrina kaif boyfriend)

काही वर्षांपूर्वी एका पार्टीमध्ये विकी आणि कतरिना एकत्र आले होते, त्यावेळी त्यांच्या नात्याविषयी पहिल्यांदा चर्चा झाली. यानंतर दोघांचे एकमेकांच्या घरी जाणे येणे वाढले. दोघेही एकमेकांची कंपनी एन्जॉय करत होते. एकदा करण जोहरने त्याच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये कतरिना म्हणाली होती ही तिला विकीसोबत काम करायला आवडेल. त्यानंतर करणने हीच गोष्ट जेव्हा विकीला सांगितली तेव्हा त्याची रिअ‍ॅक्शन बघण्यासारखी होती. यावरूनच त्या दोघांच्याही मनात एकमेकांविषयी काही आहे, हे पहील्यांदा कळले होते.

2019 मध्ये विकी कौशल आणि कार्तिक आर्यन एक अवॉर्ड फंक्शन होस्ट करत होते. या अवॉर्ड फंक्शनला सलमानसह अनेक बॉलिवूड स्टार्स उपस्थित होते. तिथे कतरिनाला स्टेजवर बोलविण्यात आले आणि विकीने सगळ्यांसमोरच 'मुझसे शादी करोगी' असं विचारत कतरिनाला प्रपोज केले. या प्रपोजची सर्वत्र चर्चा झालीच पण त्यानंतर खऱ्या अर्थाने विकी आणि कतरिना यांचे नाते चर्चेत आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com