Katrina Kaif Deepfake Video : रश्मिका, आलिया नंतर नंबर 'कतरिनाचा'! डीपफेक व्हिडिओनं चाहत्यांना बसला मोठा धक्का

आर्टिफिशियल इंटेलिजन्स जेवढे फायदेशीर आहे तेवढेच ते धोकादायक कसे ठरू शकते हे आता पुन्हा एका बातमीतून समोर आले आहे.
Katrina kaif Deepfake Video Viral Social media
Katrina kaif Deepfake Video Viral Social media esakal

Katrina kaif Deepfake Video Viral Social media : आर्टिफिशियल इंटेलिजन्स जेवढे फायदेशीर आहे तेवढेच ते धोकादायक कसे ठरू शकते हे आता पुन्हा एका बातमीतून समोर आले आहे. या एआयमुळे बॉलीवूड सेलिब्रेटींची डोकेदुखी वाढली आहे. याचा सगळ्यात पहिल्यांदा मोठा फटका हा रश्मिका मंदानाला बसला होता. त्यानंतर आलियाचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला आणि वेगळ्याच चर्चेला उधाण आले होते.

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कतरिनाचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला आणि तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. जनसत्तानं याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून डीपफेकचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावर संबंधित दोषींवर तातडीनं कारवाई करण्यात यावी असे आवाहन बॉलीवूडमधील सेलिब्रेटींकडून कर्यात आले आहे.

आतापर्यत आलिया, रश्मिका, प्रियंका, नोरा फतेही तसेच काजोलचाही डीपफेक व्हिडिओ समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या वतीनं काही या प्रकाराला आळा घालण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वंही जाहीर केली होती. यात दिलासादायक बाब म्हणजे ज्यानं पहिल्यांदा रश्मिकाचा डीपफेक व्हिडिओ तयार केला होता त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

Katrina kaif Deepfake Video Viral Social media
Ranbir Kapoor Viral Video : श्रीरामाच्या दर्शनाला आला की कतरिना सोबत फोटो काढायला? रणबीरच्या 'त्या' सेल्फीची चर्चा!

नोरानं जेव्हा तिचा डीपफेक व्हिडिओ पाहिला तेव्हा तिला मोठा धक्का बसला होता. त्यावेळी तिनं त्या व्हिडिओमधील ती मी नव्हेच, अशी प्रतिक्रिया दिली होती. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा देखील डीपफेक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. आता कतरिनाला त्या डीपफेक व्हिडिओचा सामना करावा लागला आहे.

काय आहे कतरिनाच्या डीपफेक व्हिडिओमध्ये?

कतरिनाच्या त्या डीपफेक व्हिडिओमध्ये ती सफाईनं तुर्की भाषा बोलताना दिसत आहे. खरं तर तो व्हिडिओ २०१४ मधला आहे. त्यावेळी कतरिना आणि ऋतिक रोशनचा बँग बँग नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तो व्हिडिओ त्या चित्रपटाच्या प्रमोशनचा आहे. कतरिनाच्या त्या व्हिडिओवरुन नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

कतरिना जर तुर्की भाषा बोलत असती तर कसे वाटले असते....त्यानंतर एक वैधानिक सुचना त्यावर दिली आहे. हा व्हिडिओ आर्टिफिशयल इंटेलिजन्सनं तयार केला असून त्याच्या डीपफेक टूल्सच्या माध्यमातून त्यानं अनेकांना त्रस्त केले आहे. असे त्यात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com