कतरिना कैफने सलमानची केली होती अशी नक्कल ज्यामुळे सलमानला धरावे लागले होते तिचे पाय

salman katrina
salman katrina

मुंबई- कतरिना कैफ आणि सलमान खानची जोडी अनेकांना पसंत आहे. दोघांच्या अफेअरच्या चर्चा देखील अनेकदा रंगताना पाहायला मिळतात. मात्र आजही दोघं एकमेकांचे चांगले मित्र आहेत. कतरिनाने अनेकदा सांगितलं आहे की सलमान खान तिचा खूप चांगला आणि जवळचा मित्र आहे. कतरिनाचं सलमानच्या कुटुंबियांसोबत देखील खूप चांगलं नातं आहे. ती सलमानला केवळ चांगल्या प्रकारे ओळखतंच नाही तर त्याची नक्कल देखील खूप चांगल्या प्रकारे करते. असाच एक सलमान आणि कतरिनाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती सलमान समोरंच त्याची नक्कल करतेय.

कतरिनाचा हा जुना व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये सलमान आणि कतरिना 'टायगर जिंदा है'च्या प्रमोशनसाठी एका शोमध्ये आल्याचं दिसून येतंय. कतरिना स्टेजवर सलमानची नक्कल करत त्याच्यासारखी चालत आहे. त्याच्यासारखी आळस देतेय आणि  हुबेहुब सलमानसारखे चेह-याचे हावभाव करतेय.

इतकंच नाही तर हे सगळं करताना कतरिना सलमानसारखी चालत त्याच्याच जवळ जाते आणि त्याची पाठ थोपटते. यावर सलमान वाकून तिचे पाय पकडण्याचा अभिनय करतो. हा व्हिडिओ खूप मजेशीर आहे आणि सोशल मिडियावर व्हायरल होतोय. 

सलमान खान आणि कतरिनाच्या रिलेशनशिप बाबत अनेक चर्चा होत्या ज्यावर कतरिनाने तिचं मौन सोडलं होतं. तिने सांगितलं होतं ती आणि सलमान १६ वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत यापेक्षा जास्त काही नाही. कतरिनाने सांगितलं होतं की सलमान खूप चांगला माणूस आहे. जेव्हा गरज असते तेव्हा तेव्हा तो मदतीसाठी तयार असतो. सलमान आणि कतरिना 'भारत' या सिनेमात शेवटचे एकत्र दिसले होते.   

katrina kaif imitates salman khan in a throwback video  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com