सेल्फ आयसोलेशमुळे कतरिना-कार्तिकवर आली भांडी घासण्याची वेळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि कार्तिक आर्यन सध्या कोरोना व्हायरसमुळे सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत.यादरम्यान त्यांचे व्हिडिओ समोर आले आहेत...या व्हिडिओमध्ये दोन्ही कलाकार आपापल्या घरी भांडी घासताना दिसत आहेत..

बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि कार्तिक आर्यन सध्या कोरोना व्हायरसमुळे सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत..कोरोनामुळे सध्या सगळ्याच ठिकाणी सिनेमांच्या शूटींगला बंदी आहे आणि जवळपास अनेक शहरं लॉकडाऊन होत आहेत..अशातंच या ब़ॉलीवूडकरांना त्यांच्या घरची कामं स्वतःचत करावी लागत असल्याचं चित्र दिसतंय..यादरम्यान अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता कार्तिक आर्यनचे व्हिडिओ समोर आले आहेत...या व्हिडिओमध्ये दोन्ही कलाकार आपापल्या घरी भांडी घासताना दिसत आहेत..

हे ही वाचा: अमिताभ यांनी coronavirus वर केलं असं ट्वीट जे काही वेळातंच करावं लागलं डिलीट

कतरिनाने इंस्टाग्रामवर एक मिनी फिल्म पोस्ट केली जी किचममध्ये शूट केली गेली होती..ज्यात कतरिना भांडी घासताना दिसून आली..या व्हिडिओत ती सांगतेय, कारण या सेल्फ आयसोलेशन दरम्यान घरातील कामं करण्याची देखील प्रॅक्टीस होतेय..बहीण इसाबेल आणि मी स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला आहे..मला असं वाटतं की मी यावर थोडं व्यावसायिक ट्युटोरिअल करेन..

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

really makes u appreciate all the help we have at home #socialdistancing #staysafe #helpoutathome

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

यानंतर कतरिना भांडी घासण्याचे वेगवेगळे प्रकार सांगतेय..'मी आधीच असं ठरवून घेतलं होतं की, मला प्रत्येक भांडं एक एक स्वच्छ केलं पाहिजे का ? मग नंतर मी हे करण्याचा एक मस्त उपाय शोधला..बेसीनमध्ये सगळी भांडी एकत्र घया, मग सगळी एकत्र घासून ठेवा आणि शेवटी मग सगळी एकत्र पाण्याखाली स्वच्छ धुवून काढा..ज्यामुळे पाणी देखील वाया जाणार नाही..ती सगळी भांडी एकत्र करा त्यांनी इथे ठेवा आणि मग उरलेल्या भांड्यांना एकत्रंच स्वच्छ करा..'

तर दुसरीकडे अभिनेता कार्तिक आर्यन देखील भांडी घासण्याच्या बाबतीत कतरिनाला फॉलो करताना दिसून आला..हा व्हिडिओ कार्तिकच्या बहिणने इन्टाग्रामवर पोस्ट केला..या व्हिडिओत ती कार्तिकची मस्करी करताना दिसून आली सोबतंच तिने या व्हिडिओला मजेशीर कॅप्शन दिलं आहे. 'क्वारंटाईन समजण्याची चूक करु नका.. हे कार्तिक आर्यनच्या घरातील एक सामान्य दृश्य आहे..यावर कार्तिकने हा व्हिडिओ शेअर करत याला ही घराघरातील कहाणी असल्याचं म्हटलंय..

  katrina kaif kartik aaryan turn cleaning the dishes as they self isolate  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: katrina kaif kartik aaryan turn cleaning the dishes as they self isolate