
अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी सरत्या वर्षात चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. यंदाच्या वर्षी अनेक सेलिब्रिटींच्या घरी चिमुकल्या पाहुण्यांचे आगमन झाले. आलिया-रणबीर, बिपाशा-करण यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्यांचं आगमन झाल्यानंतर आता सगळ्यांच्या नजरा कतरिना कैफ आणि विकी कौशल या जोडीकडे वळल्या आहेत.अभिनेत्री कतरिना कैफला अलीकडेच मुंबई विमानतळाबाहेर पापाराझींनी क्लिक केले. ट्रेडिशनल वेयरमध्ये कॅटच्या सुंदर लूकने नेटिझन्सची मने जिंकली आहेत.
मात्र एकीकडे चाहत्यांना तिच्या सौंदर्याचे आकर्षण असताना दुसरीकडे कॅटच्या प्रेग्नेंसीची चर्चा पुन्हा एकदा जोरात सुरु झाली आहे. सैल पिवळा कुर्ता आणि मॅचिंग पायजामा घातलेली कतरिना नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत होती. तिने मस्त शेड्स आणि सुंदर शूजसह संपूर्ण आकर्षक देखावा पूर्ण केला होता. पण हा लूज आउटफिट पाहून आता चाहत्यांना प्रश्न पडलाय. अभिनेत्री प्रेग्नंट आहे का?
कतरिना कैफ आणि विकी कौशलचे लग्न झाल्यापासून अभिनेत्रीच्या गरोदरपणाबद्दल वेळोवेळी चर्चा केली जात होती. कतरिना कैफ गरोदर असल्याच्या बातम्या गेल्या वर्षभरात 6-7 वेळा समोर आल्या आहेत. सध्या कतरिना कैफ तिच्या कामात आणि चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. श्रीराम राघवन दिग्दर्शित 'मेरी ख्रिसमस' असे या चित्रपटाचे नाव आहे.
कतरिना गरोदर असल्याच्या अफवा काही महिन्यांपूर्वी समोर आल्या होत्या, जेव्हा ती विमानतळावर सैल कुर्ता पायजामा घालून दिसली होती. तिला पाहून चाहत्यांनी कतरिना कैफ प्रेग्नंट असल्याच्या कमेंट करायला सुरुवात केली. मात्र, कतरिनाच्या चाहत्यांनी तिच्या मदतीला धावून येऊन विचारले की, एखादी व्यक्ती गरोदर असतानाच सैल कपडे घालू शकते का?
यानंतर कतरिना कैफ विकी कौशलसोबत सुट्ट्या घालवताना दिसली ज्याला बेबीमून म्हणजेच प्रेग्नेंसीदरम्यान ट्रिप म्हटले जाते. कतरिना आणि विकी कौशलची टीम या बातमीचे सतत खंडन करत होती पण अनेक मीडिया रिपोर्ट्स या बातमीला दुजोरा देत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.