लग्न आहे की शिक्षा? विकी-कतरिनाच्या पाहुण्यांसाठी अटींची मोठी यादी

पाहुण्यांना काटेकोरपणे या अटींचं पालन करावं लागणार आहे.
vicky, katrina
vicky, katrinainstagram

बॉलिवूडमधील सर्वांत चर्चेत असलेली जोडी म्हणजेच अभिनेता विकी कौशल Vicky Kaushal आणि कतरिना कैफ Katrina Kaif यांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा आहेत. अवघ्या काही दिवसांत ही जोडी लग्नबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे. हा लग्नसोहळा कसा असेल, किती पाहुण्यांना निमंत्रण असेल या सर्व गोष्टींची माहिती समोर येत आहे. जयपूरमध्ये ९ डिसेंबर रोजी विकी-कतरिना लग्नगाठ बांधणार असल्याचं कळतंय. मात्र या लग्नसोहळ्याला हजेरी लावणाऱ्या पाहुण्यांना विकी-कतरिनाने बऱ्याच अटी घातल्या आहेत. 'इंडिया टुडे'नं दिलेल्या वृत्तानुसार अटींची ही यादी बरीच मोठी आहे. पाहुण्यांना काटेकोरपणे त्याचं पालन करावं लागणार आहे.

काय आहेत या अटी?

लग्नात उपस्थित असल्याचा खुलासा करू नये

लग्नसमारंभातील फोटो काढू नये

सोशल मीडियावर फोटो शेअर करू नये

सोशल मीडियावर लोकेशन शेअर करू नये

जोपर्यंत तुम्ही विवाहस्थळ सोडत नाही तोपर्यंत बाहेरील जगाशी संपर्क करू नये

लग्न नियोजकांच्या मंजुरीनंतरच सर्व फोटो प्रकाशित केले जातील

लग्नाच्या ठिकाणी कोणतेही इन्स्टा रील किंवा व्हिडिओ बनवता येणार नाहीत

vicky, katrina
पती म्हणून राखी सावंतने उभं केलं 'बिग बॉस १५'च्या कॅमेरामनला?

विकी आणि कतरिनानं लग्नासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केल्याची बाबही समोर आली आहे. कतरिना आणि विकीनं लग्नासाठी एक दोन नव्हे तर 45 हॉटेल्स बुक केली आहेत. विकी आणि कतरिनाकडून अद्याप कोणत्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाही. मात्र त्यांच्या लग्नाला कोण जाणार याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अजय देवगण, विराट कोहली, अनुष्का शर्मा हे यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com