Katrina Kaif Good News: लग्नानंतरची कतरिनाची पहिलीच मोठी घोषणा...

सोशल मीडियावर कतरिना कैफने केलेली पोस्ट पाहून तिचे चाहते भलतेच खुशीत आहेत.
Katrina Kaif's Big Announcement On social Media
Katrina Kaif's Big Announcement On social MediaGoogle

बॉलीवूड अभिनेत्री आलियानं आपल्या प्रेग्नेंसीची गूडन्यूज दिल्यावर आता कतरिना कैफही गूडन्यूज देतेय म्हटल्यावर आपल्या सर्वांचेच कान टवकारले असलतील नाही का. पण कॅट थोडी वेगळी गूडन्यूज देतेय,पण ती ऐकल्यावरही तुम्ही तिचे चाहते असाल तर नक्कीच सुखावून जाल. तर कतरिना कैफचे(Katrina Kaif) चाहते तिच्या आगामी सिनेमांची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण त्यांना आपल्या या लाडक्या अभिनेत्रीला मोठ्या पडद्यावर पाहून आता खूप दिवस लोटलेयत. यादरम्यानच कतरिना कैफने आपल्या चाहत्यांसोबत एक गूडन्यूज(GoodNews) शेअर केली आहे. आता यामुळे तिचे चाहते मात्र आनंदून गेलेयत. (Katrina Kaif's Big Announcement On social Media)

Katrina Kaif's Big Announcement On social Media
शाहरुखच्या 'डॉन 3' मध्ये रोमा बनून येणार पॉर्न स्टार केंड्रा? वाचा सविस्तर

कतरिनानं लग्नानंतर केलेली ही मोठी घोषणाच म्हणता येईल. तिनं आपल्या आगामी सिनेमाची म्हणजेच 'फोन भूत'च्या रीलीजची घोषणा केली आहे. कतरिनानं सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करीत आपला आगामी सिनेमा 'फोन भूत'च्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. पोस्ट शेअर करीत तिनं लिहिलं आहे,''फोन भूतच्या विश्वात आपलं स्वागत आहे. ७ ऑक्टोबर २०२२ रोजी हा सिनेमा तुमच्या भेटीला येत आहे''.

Katrina Kaif's Big Announcement On social Media
'जीव वाचला पाहिजे...', प्राजक्ता माळीच्या पोस्टवर चाहते झाले भावूक

कतरिनानं ही पोस्ट केल्यानंतर तिचे चाहते भलतेच खूश झालेयत. या सिनेमाविषयीची चाहत्यांची उत्सुकता अधिकच वाढलेली दिसत आहे. या सिनेमात कतरिना सोबत ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत आहेत. कतरिनाचा लूक सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे.

या सिनेमाचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला आहे. २२ सेकंदाच्या या टीझरवरुन सिनेमाच्या कथानकाचा तर अंदाज लावला जाऊ शकत नाही,पण कतरिना भूत बनून आपल्या चाहत्यांना घाबरवणार की काय अशा चर्चेला मात्र उधाण आलंय. आता इतकं सुंदर भूत असेल तर त्याचा सामना सगळ्यांनाच करायला आवडेल नाही का.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com