
अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांच्या लग्नसोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. या लग्नसोहळ्यातील कतरिनाच्या प्रत्येक लूकची सोशल मीडियावर चर्चा झाली. तिच्या लूकमधील बारिकसारिक गोष्टींनीसुद्धा चाहत्यांचं लक्ष वेधलं. साखरपुड्याच्या अंगठीपासून ते मंगळसूत्रापर्यंत.. कतरिनाच्या प्रत्येक दागिन्याबद्दल जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. ९ डिसेंबर रोजी कतरिना-विकीने राजस्थानच्या सवाई माधोपूरमधील सिक्स सेन्सेस फोर्ट बरवारा याठिकाणी लग्नगाठ बांधली. याच दिवशी संध्याकाळी दोघांनी सोशल मीडियावर लग्नसोहळ्याचे फोटो पोस्ट केले. या फोटोंमधील कतरिनाच्या गळ्यातील मंगळसूत्राने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
लग्नसोहळ्यात कतरिनाने प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जीने डिझाइन केलेला लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता. विकीने कतरिनाच्या गळ्यात अनकट डायमंडचं मंगळसूत्र बांधलं. सब्यसाचीच्या बंगाल टायगर कलेक्शनमधील हे मंगळसूत्र आहे. मंगळसूत्रात काळे आणि सोन्याचे मणी आणि दोन छोटे ड्रॉप-डाउन हिरे आहेत.
कतरिनाच्या लेहंग्यावर गोल्ड एम्ब्रॉयडरी होती. तर लाल दुपट्ट्याच्या काठावर जरीचं काम केलं होतं. तर सिल्क टिश्यू सफासग आयवरी रंगाची शेरवानी असा विकीचा लूक होता. विकी-कतरिना ६ डिसेंबर रोजी आपल्या कुटुंबासह जयपूरला रवाना झाले. ७ डिसेंबर रोजी मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. १४ डिसेंबर रोजी ही नवविवाहित जोडी मुंबईत परतली. यावेळी पंजाबी ड्रेसवर लाल बांगड्या, मंगळसूत्र आणि सिंदूर अशा लूकमध्ये कतरिना पहायला मिळाली. तिच्या या लूकचीही चर्चा सोशल मीडियावर जोरदार झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.