'मन उडू उडू झालं' मालिकेतील 'शलाका' आहे प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी | Man Udu Udu Zhala | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharvari Kulkarni

'मन उडू उडू झालं' मालिकेतील 'शलाका' आहे प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी

झी मराठी वाहिनीवरील 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही नवी मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. प्रेक्षकांकडून या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळतोय. या मालिकेतील सर्वच भूमिकांची सोशल मीडियावर चर्चा असते. यामध्ये अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) ही दीपूची भूमिका साकारत असून अभिनेता अजिंक्य राऊत इन्द्रा ही भूमिका साकारतोय. मालिकेत देशपांडे कुटुंबात शलाका, सानिका आणि दीपिका या तीन मुली आहेत. लवकरच शलाका ही लग्न करून अमेरिकेला जाणार असल्याने देशपांडे कुटुंबात तिच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. मालिकेत शलाका ही खूप साधी भोळी आणि हळवी आहे. ही भूमिका अभिनेत्री शर्वरी कुलकर्णी साकारतेय.

अभिनेत्री शर्वरी ही मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री संपदा कुलकर्णी यांची मुलगी आहे. संपदा कुलकर्णी या मराठी चित्रपट, मालिका तसंच नाटकात एक उत्तम अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. आपल्या आईच्या पावलावर पाऊल टाकत त्यांची मुलगी शर्वरी ही देखील अभिनय क्षेत्रात आपला जम बसवू पाहत आहे.

हेही वाचा: महेश मांजरेकर यांनी 'बिग बॉस मराठी ३'मधून का घेतली माघार?

Sampada and Sharvari Kulkarni

Sampada and Sharvari Kulkarni

'मन उडू उडू झालं' या मालिकेतील शलाका या भूमिकेसाठी शर्वरी हिने मेहनत घेतली असून तिची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडतेय. मालिका विश्वातील सुप्रसिद्ध दिग्दर्शकाच्या यादीत आघाडीवर असणारे दिग्दर्शक मंदार देवस्थळी या मालिकेचं दिग्दर्शन करत आहेत. 'वादळवाट', 'अवघाचि हा संसार', 'होणार सून मी ह्या घरची', 'फुलपाखरू', या त्यांनी दिग्दर्शिका केलेल्या मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या आणि त्यातील व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं.

Web Title: Shalaka In Man Udu Udu Zhala Is The Daughter Of A Famous Marathi Actress

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top