'कटप्पा' साकारणाऱ्या सत्यराज यांना कोरोनाची लागण; रुग्णालयात उपचार सुरु

Sathyaraj
Sathyaraj
Summary

सुरुवातीला त्यांना होम आयसोलेशनमध्येच ठेवण्यात आलं होतं. मात्र जास्त त्रास होऊ लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

बाहुबली (Bahubali) या चित्रपटात कटप्पाची (Katappa) भूमिका साकारणारे दिग्गज अभिनेते सत्यराज (Sathyaraj) यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सत्यराज यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सत्यराज गेल्या काही दिवसांपासून कोरोनावर उपचार घेत आहेत. सुरुवातीला त्यांना होम आयसोलेशनमध्येच ठेवण्यात आलं होतं. मात्र जास्त त्रास होऊ लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

सत्यराज यांची प्रकृती आता कशी आहे याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सत्यराज यांनी काही दिवस घरीच उपचार घेतले. मात्र गंभीर लक्षणे दिसताच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सत्यराज यांचे वय सध्या ६७ वर्षे इतके आहे.

तामिळ चित्रपटसृष्टीत सत्यराज सुपरस्टार आहेत. १९७८ मध्ये त्यांनी त्यांच्या मनोरंजनविश्वातील कारकिर्दीला सुरुवात केली होती. प्रभासच्या बाहुबली चित्रपटात कटप्पा या चित्रपटाने त्यांना विशेष ओळख मिळवून दिली.

Sathyaraj
जॅकलिन अन् सुकेशचा 'किस''लव्हबाईट्स'चा नवीन फोटो व्हायरल...

सध्या बॉलिवूडसह साउथचे अनेक अभिनेते, अभिनेत्री कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. सुपरस्टार महेश बाबु, मांचू मनोज, मांचू लक्ष्मी, अभिनेता विश्व सेन, अभिनेत्री त्रिशा यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com