बिग बॉस फेम जॅस्मिन भसीनला बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी; स्वतः केला खुलासा Jasmin Bhasin | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Big boss 14 fame and tv actrress jasmin bhasin reveals she got rape and death threats

बिग बॉस फेम जॅस्मिन भसीनला बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी; स्वतः केला खुलासा

Jasmin Bhasin: जॅस्मिन भसीन छोट्या पड्द्यावरचं एक प्रसिद्ध नाव. बिग बॉस १४(Big Boss 14) मध्ये सामिल झाल्यानंतर जॅस्मिन भसीन घराघरात ओळखली जाऊ लागली. सोशल मीडियावर देखील जॅस्मिनला तिच्या चाहत्यांकडून भरपूर प्रेम आतापर्यंत मिळालं आहे. पण बिग बॉस च्या घरातून बाहेर पडल्यावर जॅस्मिनला प्रेमासोबत लोकांच्या रागाचाही सामना करावा लागतोय. याविषयी स्वतः जॅस्मिननं एका मुलाखतीत खुलासा केला आहे.(Big boss 14 fame and tv actrress jasmin bhasin reveals she got rape and death threats)

हेही वाचा: Koffe With karan 7: रणवीर सिंगचा राग-राग करतो टायगर श्रॉफ, करण समोर केलं कबूल

जॅस्मिन भसीननं एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तिला बलात्कार करुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. अभिनेत्री म्हणाली आहे-''ट्रोलिंग तर होत असतंच,पण त्याव्यतिरिक्त बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर मला लोकांकडून बलात्कार करुन जीवे मारण्याची धमकी देखील मिळाली आहे. आणि ते ही कशाबद्दल? फक्त यासाठी की मी एका शो मध्ये सहभागी झाले आणि त्यात मी त्यांना आवडले नाही म्हणून''.

जॅस्मिन पुढे म्हणाली-''मी ज्याचा सामना केला ते खूपच गंभीर प्रकरण होतं. या सगळ्या गोष्टींनी मानसिक पातळीवर माझ्यावर खूप परिणाम केला आहे. पण मानसोपचार तज्ञांच्या,कुटुंबाच्या आणि माझ्या जवळच्या मित्रपरिवाराच्या मदतीनं मी या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडू शकले''.

हेही वाचा: ट्विंकल आता UK मध्येच राहणार असल्याचा अक्षय कुमारकडून खुलासा; म्हणाला...

जॅस्मिन यासंदर्भात पुढे सांगताना म्हणाली-''आजकाल मला कुणी ट्रोल केलं तरी मला ते कळत नाही किंवा मी त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करायला शिकले आहे. मी आज अशा ठिकाणी आहे जिथे मला लोकांकडून खूप प्रेम मिळालं आहे. ट्रोलिंग खूप छोटी गोष्ट आहे. त्याच्याकडे लक्ष न देणं हे उत्तम. जे लोक माझ्यावर प्रेम करतात,तर मला ही त्यांच्याशी तसंच वागायला हवं. जर त्यांना मी आवडत नाही,ते माझा राग करतात तर ती त्यांची इच्छा. प्रत्येकाला आपली मतं असतात,त्यानं तसं वागावं,त्यात मी काहीच करू शकत नाही,करू नये. मी माझा राग करणाऱ्या लोकांना फार महत्त्व देत नाही. कारण तसंही मी माझ्या आयुष्यात खूप बिझी आहे''.

हेही वाचा: 'माझ्यासाठी हा निर्णय धाडसी होता..', बिग बॉस फेम शिवानी सुर्वे असं का म्हणाली?

जॅस्मिन पुढे म्हणाली-''आपल्याला असे लोक हवेतच कशाला,जे आपला राग राग करतात. आपल्याला लोकांनी शिव्या द्याव्यात,आपला राग करावा म्हणून मी हे करिअर निवडलेलं नाही. ट्रोलर्सना वाटतं ते जे हवं ते लिहू शकतात,कारण त्यांना चेहरा नसतो. जर त्यांच्यात हिम्मत असेल तर समोर येऊन तुमचं मत मांडा. पण यांच्याकडे दुसरं काही काम नसतं, घाबरट आहेत ते,ज्यांना फक्त तुम्हाला उदास करणं माहीत असतं''.

हेही वाचा: 'प्रिय शेजाऱ्यांनो...', टीम इंडियाकडून हरल्यावर नकुलचा पाकिस्तानला मजेशीर सल्ला

जॅस्मिन भसीन बिग बॉस १४ मध्ये चर्चेत राहिलेली स्पर्धक होती. अली गोनी सोबतच्या तिच्या अफेअरनं तेव्हा बिग बॉसचा टीआरपी चांगलाच वाढवला होता. जॅस्मिनचं करिअरही सध्या व्यवस्थित सुरू आहे.

Web Title: Big Boss 14 Fame And Tv Actrress Jasmin Bhasin Reveals She Got Rape And Death

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..