अरे देवा! प्रियांकाबद्दल एक ट्विट केलं अन् झाली ट्रोल | Priyanka Chopra | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Priyanka Chopra and Kavita Kaushik

अरे देवा! प्रियांकाबद्दल एक ट्विट केलं अन् झाली ट्रोल

'एफआयआर' या मालिकेत चंद्रमुखी चौटालाची भूमिका साकारणारी अभिनेत्री कविता कौशिक Kavita Kaushik सध्या तिच्या एका ट्विटमुळे चर्चेत आली आहे. कविताने नुकत्याच केलेल्या ट्विटमध्ये अभिनेत्री कंगना राणावतला Kangana Ranaut मिळालेल्या पद्मश्री Padma Shree पुरस्कारावरून टोला लगावला आहे. मात्र कंगनावर टीका करताना कविताकडून एक चूक झाली आणि त्यामुळेच तिला नेटकरी ट्रोल करत आहेत. अभिनेत्री प्रियांका चोप्राला Priyanka Chopra पद्म पुरस्कार का मिळाला नाही, असा प्रश्न कविताने या ट्विटमध्ये मांडला.

प्रियांका आणि तिचा पती निक जोनास यांचा लॉस एंजिलिसमधल्या घरात पूजा करतानाचा फोटो कविताने ट्विटरवर पोस्ट केला. तिने लिहिलं, 'तिला पद्मश्री का मिळाला नाही? अप्रतिम अभिनेत्री, हुशार व्यक्तीमत्त्व, जगभरात यश मिळवलंय आणि भारतीय असल्याचा गाजावाजा न करता भारताची संस्कृती तिथेही जपतेय. आणि हो तिथे कधीच कोणत्या ज्येष्ठ व्यक्तीचा किंवा समकालीन कलाकाराचा किंवा इतर कोणाचाही अपमान केला नाही. ती खूप छान आहे.' प्रियांका चोप्राला २०१६ मध्येच पद्मश्री पुरस्कार मिळाला होता, याची माहिती कविताला नसल्याने तिला ट्रोल करण्यात येत आहे.

हेही वाचा: "..तेव्हा हिंदू खलनायक का खटकले नाहीत?"; रोहित शेट्टीचा सवाल

'तिला आधीच पद्म पुरस्कार मिळाला आहे. पण तू जे म्हणालीस ते खरं आहे. त्या गोष्टीचा ती फार गाजावाजा करत नाही, म्हणून लोकांना माहित नसेल', असं एका युजरने लिहिलं. तर 'आधी नीट गुगलवर सर्च कर आणि मग ट्विट कर', असा टोला दुसऱ्याने लगावला. कंगनाला या महिन्यात पद्म पुरस्काराने गौरविण्यात आलं. मात्र त्यानंतर एका मुलाखतीत देशाच्या स्वातंत्र्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तिच्यावर टीका होत आहे. '१९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं, ती भीक होती. खरं स्वातंत्र्य तर २०१४ मध्ये मिळालं', असं कंगना म्हणाली.

loading image
go to top