
बिग बींनी नुकताच दिवाली स्पेशल एपिसोड शूट केला. यावेळी ते वेगळ्याच अंदाजात दिसून आले. दिवाली स्पेशल एपिसोडमध्ये बिग बींनी फॉर्मल्सच्या ऐवजी कुर्ता पायजामा असा पारंपारिक पेहराव केला होता.
मुंबई- बॉलीवूडचे शेहनशाह अमिताभ बच्चन सध्या 'कौन बनेगा करोडपती'च्या १२ सिझनच्या शुटींगमध्ये बिझी आहेत. नुकताच त्यांनी या शोचा दिवाली स्पेशल एपिसोड शूट केला. यावेळी बिग बी वेगळ्याच अंदाजात दिसून आले. दिवाली स्पेशल एपिसोडमध्ये बिग बींनी फॉर्मल्सच्या ऐवजी कुर्ता पायजामा असा पारंपारिक पेहराव केला होता. त्यांनी स्वतःचा त्यांचा फोटो शेअर करत या लूकची एक झलक चाहत्यांना दाखवली होती. शुक्रवारच्या एपिसोडची सुरुवातंच बिग बींनी एका सुंदर कवितेने केली.
'केबीसी'च्या या एपिसोडची सुरुवात वडोदरा येथून आलेल्या शर्मिला गार्गायनने हॉट सीटवर बसून केली. पाच हजार रुपयाच्या प्रश्नापासून याची सुरुवात झाली. हा प्रश्न नृत्यकलेशी संबंधित होता. हा प्रश्न ऐकल्यानंतर शर्मिलाने बिग बींना सांगितलं की ती हा नृत्य प्रकार शिकली आहे. इतकंच नाही तर याविषयी अधिक सांगताना ती म्हणाली की तिने संगीतात एम ए केलं आहे. हे ऐकून बिग बींना आनंद झाला.
“Iss Diwali mann ka aangan gyaan se jagmag karna hai” #KBC12 wishes all a happy and prosperous #Diwali. Let the power of knowledge illuminate our lives! @SrBachchan pic.twitter.com/Y2CCwtTQWp
— sonytv (@SonyTV) November 13, 2020
शर्मिलाने जसं तिच्या या कलेविषयी सांगितलं तशी लगेचच बिग बींनी एक खास फर्माइश केली. यावर जेव्हा बिग बींनी म्युझिक म्हटलं तेव्हा केबीसीची प्रसिद्ध थीम म्युझिक सुरु झाली. केबीसीच्या थीम ट्युनवर शर्मिला गार्गायनने सुंदर कथ्थक मुद्रा सादर केल्या. हा परफॉर्मन्स बघताना बिग बींचा चेहरा खुलला होता. जसा हा परफॉर्मन्स संपला तशी बिग बींनी तिच्या कलेची स्तुती करायला सुरुवात केली. बिग बींसोबतंच प्रेक्षकांनाही हा डान्स चांगलाच भावला.
kbc 12 contestant sharmila dances on the famous theme tune of amitabh show kbc