सुपरस्टार रजनीकांत यांनी खरेदी केली सुपरकार, लॅम्बोर्गिनीची किंमत ऐकून डोळे चक्रावतील

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Saturday, 5 September 2020

रजनीकांत यांनी नुकतंच त्यांच्या चाहत्यांना चकित केलं आहे. त्यांनी नुकतीच एक कार खरेदी केली आहे.  ही कार घेणं अनेकांच स्वप्न असतं.

मुंबई- साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांचे चाहते जगभरात पसरले आहेत. सोशल मिडियावर त्यांची एखादी पोस्ट आली की लगेचच व्हायरल होते. रजनीकांत यांच्या चाहत्यांना नुसतं चाहते म्हणून चालणार नाहीत तर ते त्यांना फॉलो करमार कट्टर चाहते असतात. रजनीकांत यांना ते देवाप्रमाणेच मानतात. रजनीकांत यांनी एकापेक्षा एक ब्लॉकबास्टर सिनेमे करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यांचा प्रत्येक नवा सिनेमा हा साऊथमध्ये एका नवीन सणासारखा असतो. रजनीकांत यांनी नुकतंच त्यांच्या चाहत्यांना चकित केलं आहे. त्यांनी नुकतीच एक कार खरेदी केली आहे.  ही कार घेणं अनेकांच स्वप्न असतं.

हे ही वाचा: सुशांत सिंह राजपूत करणार होता सारा अली खानला प्रपोज, 'या' व्यक्तीने केला खुलासा 

बॉलीवूडमधील मेगा स्टार यांची नवीन कार चर्चेत असतानाच आता सुपरस्टार रजनीकांत यांच्या कार खरेदीने चाहत्यांना वेड लावलंय. रजनीकांत यांनी लॅम्बोर्गिनी उरुस एसयुव्ही गाडी खरेदी केली आहे. या कारची किंमत ऐकून तुमचे डोळे चक्रावतील. याची किंमत आहे ३ कोटींपेक्षा जास्त आहे. रजनीकांत यांची ही कार नेव्ही ब्लु रंगाची आहे. रजनीकांत स्वतः ही गाडी चालवताना दिसून आले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Thalaivar in action  @rajinikanth #rajinikanth #superstar #lamborghini #urus #ASIChennai

A post shared by Automotive Scenes in Chennai (@_automotivescenesinchennai_) on

सोशल मिडियावर त्यांचे कित्येक फोटो व्हायरल होत आहेत. रजनीकांत साधं राहण्याला प्राधान्य देतात. त्यांच्या नुकत्याच आलेल्या फोटोमधून याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. रजनीकांत यांनी फोटोमध्ये लुंगी आणि सफेद कुर्ता घातलेला दिसून येतोय. चाहते थलायवाच्या फोटोवर मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया देत आहेत. 

रजनीकांत यांच्या एका फॅनपेजवरुन आणखी एक फोटो पोस्ट केला गेला होता. ज्यामध्ये म्हटलंय की 'सुपरस्टार रजनीकांत त्यांची मुलगी सौंदर्याच्या कुटुंबासोबत. फोटोमध्ये दिसत असलेली कार लॅम्बोर्गिनी उरुस आहे ज्याचे फोटो आपण याआधी पाहिले. त्यात रजनीकांत स्वतः कार चालवत होते. त्यांच्या चेह-यावरचं हास्य आणि आनंद पाहून खूप छान वाटलं.'  

rajinikanth bought brand new lamborghini urus suv car price can surprised you  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rajinikanth bought brand new lamborghini urus suv car price can surprised you