KBC 13 : शिक्षिकेनं जिंकले एक कोटी, आता लक्ष्य सात कोटीचं

केबीसीमध्ये काहीही होऊ शकतं याचा अनुभव यापूर्वी आपण अनेकदा घेतला आहे.
KBC 13 : शिक्षिकेनं जिंकले एक कोटी, आता लक्ष्य सात कोटीचं

मुंबई - केबीसीमध्ये काहीही होऊ शकतं याचा अनुभव यापूर्वी आपण अनेकदा घेतला आहे. कित्येक स्पर्धकांनी त्यात बाजी मारली आहे. अनेकांनी अतिआत्मविश्वासानं आहे ते पैसेही गमावले आहेत. या कार्यक्रमाविषयी बऱ्याचदा चर्चा झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या कार्यक्रमाची प्रेक्षकांमध्ये क्रेझ आहे. आता त्या कार्यक्रमामध्ये बिग बी अमिताभ बच्चन हे काम करणार नाहीत. अशी चर्चा होती. मात्र ते पुन्हा त्या कार्यक्रमाच्या सेटवर परतले आहेत. त्यामुळे त्यांच्याही नावाची चर्चा झाली आहे. सध्या या शो मध्ये आलेल्या दिव्यांग शिक्षिका हिमानी बुंदेला यांच्या नावाची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. त्यांनी चक्क एक कोटी रुपये जिंकले आहेत. आता त्या सात कोटी रुपयांच्या प्रश्नाला उत्तर देणार आहे. त्या सात कोटी रुपये जिंकणार का, याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

आग्रा येथील शिक्षिका हिमानी बुंदेला यांनी आपल्या विचारांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. जिंकणारा कोणतं वेगळं काम करत नाही. तो ती गोष्ट वेगळ्या पद्धतीनं करतो. या शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यांच्या केबीसीच्या प्रवासाला सुरुवात झाली. आणि बघता बघता त्यांनी आपल्या ज्ञानाच्या जोरावर एक कोटी रुपये जिंकले. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या एपिसोडची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. हिमानी या एक शिक्षिका आहे. त्या प्राथमिक शाळेत शिकवतात. त्या गणिताच्या शिक्षिका आहेत. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या त्या एपिसोडचा ट्रेलर व्हायरल झाला आहे. त्याला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणावर पसंती मिळताना दिसत आहे.

KBC 13 : शिक्षिकेनं जिंकले एक कोटी, आता लक्ष्य सात कोटीचं
'सिरियल किसर' कसा झालो? अभिनेता इमरान हाश्मीची गोष्ट...

२०११ मध्ये हिमानी यांना अपघात झाला होता. त्या अपघातात त्यांना त्यांची दृष्टी गमावली होती. मात्र असे होऊनही हिमानी यांनी हार मानली नाही. त्या मोठ्या जिद्दीनं आपल्या आयुष्याला सामोऱ्या गेल्या. अथक कष्टातून त्यांनी आपलं आयुष्य घडवलं. इतरांना प्रेरणा देणारं आयुष्य त्या जगल्या आहेत. त्याविषयी त्या एपिसोडमध्ये दाखवले जाणार आहे. आपल्या आतापर्यतच्या प्रवासाबद्दल हिमानी सांगतात की, सगळेच तर आपआपल्या पद्धतीनं जगत असतात. मात्र त्या जगण्याला काही अर्थ असावा. असं मला वाटतं. ते सुत्र कायम मनाशी ठेवलं. आणि त्यानुसार वाटचाल केली. त्यात अनेकदा असंख्य अडचणी आल्या. मात्र त्यावर मात करत. विजय मिळवला हे सांगताना हिमानी यांचा चेहरा उजळून निघाल्याचे दिसून येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com